राज्यात सीईटीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार

मुंबई : राज्यात सर्व सीईटी परीक्षा (CET Exam) या १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येतील. तसेच येत्या काही दिवसांत अंतिम तारीख व वेळापत्रकांची नेमकी माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल, असे राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केलं आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) दिनांक १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा. असं उदय सामंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्वीट देखील केलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसचे वाढते रुग्ण आणि अद्यापही कमी न होणारा प्रार्दुभाव यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता साधारण एका महिन्याने ही परीक्षा घेतली जाणार आहे.