भदंत सदानंद महाथेरो यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांना दुःख

मुंबई : अखिल भारतीय भिख्खू संघाचे संघानुशासक महास्थविर सद्धम्मादित्य भदंत सदानंद महाथेरो यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. 

त्यांच्या निर्वाणामुळे धम्म अनुयायींचे मार्गदर्शक छत्र हरपले आहे. धम्म आचरणात सामाजिक  भान, उदात्तता जोपासणारे भदंत म्हणून ते परिचित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित भदंत सदानंद यांनी धम्म अनुशासक म्हणून मोठे काम उभे केले आहे. यापुढे त्यांची उणीव निश्र्चितच भासत राहील अशा शब्दांत  मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.