आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरकडे आज रवाना

यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हा सोहळा संपन्न होईल. मानाच्या पालख्या विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी होणार आहे.

    मुंबई: ”पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” अशा जयघोषात तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चलपादुकांचे सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर शासनाकडून पालखी प्रवासासाठी देण्यात आलेल्या दोन्ही विशेष शिवशाही बसमध्ये निमंत्रीत चाळीस वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत. वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी दोन नंतर वाहनाने पंढरपूरकडे रवाना होणार असून, उद्या मंगळवार (दि. 20) जुलै रोजी पहाटे सव्वा दोन वाजता मुख्यमंत्री महोदय हे सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार आहेत.

    यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हा सोहळा संपन्न होईल. मानाच्या पालख्या विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी होणार आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी दोन नंतर वाहनाने पंढरपूरकडे रवाना होणार असून, उद्या मंगळवार (दि.२o) जुलै रोजी पहाटे सव्वा दोन वाजता मुख्यमंत्री महोदय हे सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार आहेत.