uddhav thakre and devendra fadanvis

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(chief minister uddhav thakre) यांनी आधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोलावं आणि मग देशातल्या शेतकऱ्यांची उदाहरणं द्यावीत, असेे देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी म्हटले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(chief minister uddhav thakre) यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना आश्वासनांचा विसर पडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोलावं आणि मग देशातल्या शेतकऱ्यांची उदाहरणं द्यावीत, असेे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना घरात घुसून मारलं जात आहे. असे असताना उद्धव ठाकरे देशातील शेतकरी आंदोलनाची उदाहरणं देतायतं. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र शेतकऱ्यांना अद्याप फुटकी कवडीही मिळालेली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.