The child's struggle to fulfill the mother's wishes; Helicopter trip on 50th birthday

उल्हासनगर शहरातील प्रदीप गरड यांनी आपल्या आईच्या आनंदासाठी तसेच तिच्या इच्छेखातर तिला अनोखे गिफ्ट दिले आहे. प्रदीप गरड हा लहानपणी बारावीचे शिक्षण घेत असताना एके दिवशी त्यांच्या घरावरून हेलिकॉप्टर गेले तेव्हा प्रदीपची आई रेखा गरड सहज बोलून गेल्या की, आपल्याला कधी यात बसायला मिळेल? ती गोष्ट प्रदीपच्या मनावर खोलवर रुजली गेली. यानंतर प्रचंड मेहनत घेऊन, शिक्षण क्षेत्रात प्रगती करत प्रदीपने प्रथम स्वत: कुटुंबाला चाळीतून स्वकमाईच्या फ्लॅटमध्ये घेऊन आला.

    मुंबई : आईच्या उपकारांचे पांग पुढच्या सात जन्मात फेडणे अशक्य आहे. पण त्यांना आनंद वाटेल अशी कृती आपण नक्कीच करू शकतो. उल्हासगरमधील एका मुलाने त्याच्या आईच्या आनंदासाठी तिच्या 50 व्या वाढदिवशी चक्क हेलिकॉप्टरची सफर घडवून एक आगळेवेगळे गिफ्ट दिले आहे. मुलाचे प्रेम पाहून आईला देखील आनंदाश्रू अनावर झाले. सध्या या मायलेकाच्या हेलिकॉप्टर राईडची चर्चा संपूर्ण शहरात रंगत आहे.

    उल्हासनगर शहरातील प्रदीप गरड यांनी आपल्या आईच्या आनंदासाठी तसेच तिच्या इच्छेखातर तिला अनोखे गिफ्ट दिले आहे. प्रदीप गरड हा लहानपणी बारावीचे शिक्षण घेत असताना एके दिवशी त्यांच्या घरावरून हेलिकॉप्टर गेले तेव्हा प्रदीपची आई रेखा गरड सहज बोलून गेल्या की, आपल्याला कधी यात बसायला मिळेल? ती गोष्ट प्रदीपच्या मनावर खोलवर रुजली गेली. यानंतर प्रचंड मेहनत घेऊन, शिक्षण क्षेत्रात प्रगती करत प्रदीपने प्रथम स्वत: कुटुंबाला चाळीतून स्वकमाईच्या फ्लॅटमध्ये घेऊन आला.

    पुढे संसार सुरू झाला लग्न झाले, मुले झाली पण आईची इच्छा त्याच्या मनात कायम होती. ती पूर्ण करण्यासाठी तो धडपडत होता आणि अखेर तो दिवस उजाडला आईच्या 50 व्या वाढदिवसाला तिला भेट म्हणून हेलिकॉप्टरने फिरवण्याची कल्पना प्रदीपला सुचली. आईच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदीपने तिला न सांगता थेट जुहू एअरबेसला नेले. तिथे भले मोठे हेलकॉप्टर पाहून आईचा कंठ दाटून आला आणि रेखा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.