चिमणी गिधाडांना भारी पडली; जितेंद्र आव्हाडांची केंद्र सरकारवर टीका

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक दृश्य ट्विट केले आहे. चिमणी हा ट्विटरचा लोगो आहे. या ‘लोगो’ला भगव्या रंगाने वेढा दिला असल्याचे दाखवण्यात आले. त्यातच ट्विटर हे नाव दिले आहे. या फोटो सोबत एक ओळही आव्हाड यांनी लिहिली आहे. “चिमणी गिधाडांना भारी पडली” जितेंद्र आव्हाड यांनी संकेतातून मोदी सरकारवर टीका केली आहे.

    मुंबई : केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना २६ मेपर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करायची होती. ट्विटरने याचे पालन केले नाही, यावरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्या संघर्ष निर्माण झाला आहे.

    दरम्यान यासंदर्भात केंद्राकडून ट्विटरला वारंवार सूचना देण्यात आली होती, पंरतु ट्विटरने नियम पालनास नकार दर्शवला. त्यामुळे केंद्राने ट्विटरला अंतिम नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकार आणि ट्विटरमधील संघर्ष विकोपाला गेला आहे.

    केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील या संघर्षावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक दृश्य ट्विट केले आहे. चिमणी हा ट्विटरचा लोगो आहे. या ‘लोगो’ला भगव्या रंगाने वेढा दिला असल्याचे दाखवण्यात आले. त्यातच ट्विटर हे नाव दिले आहे. या फोटो सोबत एक ओळही आव्हाड यांनी लिहिली आहे. “चिमणी गिधाडांना भारी पडली” जितेंद्र आव्हाड यांनी संकेतातून मोदी सरकारवर टीका केली आहे.