वाझेच्या डायरीतील कोडवर्ड वसुली केल्याचेच; बार मालकानेही दिली ५५ लाख दिल्याची कबुली

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. ५ एप्रिल रोजी उच्च न्यायालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. आता देशमुख यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल केला आहे. तपासानुसार वाझेच्या डायरीतील कोडवर्ड वसुली केल्याचेच असून बार मालकानेही दिली ५५ लाख दिल्याची कबुली दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. ५ एप्रिल रोजी उच्च न्यायालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. आता देशमुख यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल केला आहे. तपासानुसार वाझेच्या डायरीतील कोडवर्ड वसुली केल्याचेच असून बार मालकानेही दिली ५५ लाख दिल्याची कबुली दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

    एनआयएने वाझेकडून एक डायरी जप्त केली आहे. या डायरीत कोडवर्डमध्ये वसुलीच्या नोंदी आहेत. एनआयएने मुंबईतील बारमालक महेश शेट्टी याची चौकशी केली होती. त्याने वाझेला एकूण एक कोटी ५५ लाख रुपये दिल्याची कबुली दिली आहे. डायरीतील नोंदी आणि बार मालकाचा जबाब यावरुन हप्ता वसुली झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

    वाझे याला सेवेत पुन्हा घेण्याबाबतचा निर्णय अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात झाला होता, त्याच प्रमाणे वाझे याला मुंबईतून शंभर कोटी रूपयांच्या खंडणी वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते असे आरोप सिंग यानी केले होते.

    २० मार्च ला माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणात ५ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने प्राथमिक तपास करून तथ्य असल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयचा तपास सुरू झाल्यानंतर सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांचा देखील जबाब एनआयए कस्टडीत जावून सीबी आयकडून नोंदविण्यात आला होता. त्यात वाझे यांने देशमुख यांनी शंभर कोटी जमविण्याबाबत सांगितल्याच्या आरोपांची पुष्टी केली होती.