तुंबलेल्या मुंबईला पहिल्याच पावसाची दिलासादायक बातमी; पाणीसाठ्यात झाली कमालीची वाढ

चार-पाच दिवसांपासून मुंबई परिसरातही मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका वाढला आहे.

    मुंबई : गेल्या चार दिवसांत पावसाने मुंबैची दैना केली असली तरी याच पावसाने दिलासादायक बातमी देखील दिली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या क्षेत्रात झालेल्या पावसाने पाणी पातळीत चांगली भर पडली आहे. मुंबई परिसरात मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार, भातसा या सात धरणांच्या क्षेत्रात वरूणराजाच्या हजेरीने समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे.

    एक लाख ८५ हजार ९८१ दशलक्ष लीटर पाणीसाठा शिल्लक

    चार-पाच दिवसांपासून मुंबई परिसरातही मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका वाढला आहे.

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतून मुंबईला दररोज तीन हजार आठशे दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो. सततच्या पावसामुळे तलावांमध्ये एकूण एक लाख ८५ हजार ९८१ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुलैपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे पुढील दीड महिना मुंबईकरांची चिंता मिटली आहे.

    The comforting news of the first rains in flooded Mumbai There has been a tremendous increase in water supply