मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून कौतुक!, साकीनाका निर्भया पीडितेच्या कुटुंबियांना आयोग करणार मदत

पीडित कुटुंबियांना नियमानुसार आर्थिक मदत, मुलांचे शिक्षण पीडित कुटुंबाला घर मिळणार आहे. आयोग ह्याबाबत लक्ष देणार आहे. जर काही कमतरता झाली तर आयोग नजर ठेवणार असल्याचे ते म्हणाले. अनुसूचित जातीच्या लोकांवर जऱ कोणी अत्याचार केला तर त्याच्यावर कडक कारवाई व्हावी याची दखल अनुसूचित जाती आयोग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    मुंबई : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने साकीनाका निर्भया घटनेची गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यांनतर पीडीत कुटुंबाला लवकरात लवकर मदत करण्यात येईल माहिती राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी दिली. या प्रकरणात आता ॲट्रॉसिटी संदर्भातील कलम सुद्धा लावण्यात आल्याबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी मुंबई पोलिसांची कामगिरी अत्यंत चांगली असून काही वेळातच आरोपीला अटक केली हे कौतुकास्पद आहे. असे सांगत पोलिसांचे कौतुक केले.

    चांगले केले त्याला चांगलेच म्हणणार

    ते म्हणाले की, जे चांगले केले त्याला मी चांगले म्हणणार. हलदार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत राज्य सरकारला योग्य ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पीडित कुटुंबियांना नियमानुसार आर्थिक मदत, मुलांचे शिक्षण पीडित कुटुंबाला घर मिळणार आहे. आयोग ह्याबाबत लक्ष देणार आहे. जर काही कमतरता झाली तर आयोग नजर ठेवणार असल्याचे ते म्हणाले. अनुसूचित जातीच्या लोकांवर जऱ कोणी अत्याचार केला तर त्याच्यावर कडक कारवाई व्हावी याची दखल अनुसूचित जाती आयोग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.