काँग्रेस पक्ष या शेतक-यांसोबत असून कायदे मागे घेईपर्यंत संघर्ष करत राहील : बाळासाहेब थोरात

केंद्रातील भाजप आणलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा निषेध करत काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. राज्यभरात स्पीक अप फॉर फार्मर्स ही ऑनलाईन मोहीम चालवण्यात आली आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : कृषी सुधारणा विधेयकाला खासदारानी विरोध करुनही केंद्र सरकारने ही विधेयके मंजूर केली आहेत. आता हे कायदे मागे घ्यावेत यासाठी देशभरात शेतकरी (Farmers )आंदोलन करत आहे. काँग्रेस पक्ष (Congress party ) या शेतकऱ्यांसोबत असून कायदे (fight till the laws are withdrawn) मागे घेत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष सुरुच राणार असा इशाराच काँग्रेसने दिला आहे. असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे.

केंद्रातील भाजप आणलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा निषेध करत काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. राज्यभरात स्पीक अप फॉर फार्मर्स ही ऑनलाईन मोहीम चालवण्यात आली आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

सोमवारी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. तसेच एक कोटी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार आहे. हे काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर आंदोलन, मोर्चे काढणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा केंद्रातील भाजप सरकार विरोधात संघर्ष सुरुच राहणार आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले आहे.