कोरोना महामारीमुळे वर्क फ्रॉम होम हे नवीन कल्चर सुरु , देशातील जवळपास 60 टक्के कर्मचारी कमी पगारातही नोकरी बदलण्यासाठी तयार; सर्व्हेतून समोर आली माहिती

देशातील जवळपास 60 टक्के कर्मचारी कमी पगारातही नोकरी बदलण्यासाठी तयार आहे. यासाठी अट केवळ एक आहे की, त्यांना कुठूनही काम करण्याची मुभा असावी. म्हणजेच त्यांना घरातून किंवा ऑफिसमधून काम करण्याची मुभा दिली जावी.

    मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर कंपन्यांपासून कर्मचारी हा नवा ट्रेण्ड आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवण्याचा विचार करत आहेत. असे बरेच कर्मचारी आहे, ज्यांना पूर्णवेळ ऑफिसमध्ये काम करायचं नाही, महत्त्वाचं म्हणजे यासाठी ते पगारात तडजोड करण्यासाठीही तयार आहेत.

    देशातील जवळपास 60 टक्के कर्मचारी कमी पगारातही नोकरी बदलण्यासाठी तयार आहे. यासाठी अट केवळ एक आहे की, त्यांना कुठूनही काम करण्याची मुभा असावी. म्हणजेच त्यांना घरातून किंवा ऑफिसमधून काम करण्याची मुभा दिली जावी.

    कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारताच्या वर्क इकोसिस्टममध्ये आणखी काय बदल झाले आहेत हे या सर्व्हेतून समोर आलं आहे. हा सर्व्हे 1000 भारतीय वर्किंग प्रोफेशनल्ससोबत करण्यात आला, ज्यात विविध क्षेत्रातील आणि विविध जॉब प्रोफाईल असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

    Awfis च्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे की, ऑफिसमध्ये राहून टीम मॅनेज करणं सोपं जातं असं 71 टक्के जणांनी मान्य केलं. तर फिजिकल वर्कस्पेसमधील नेटवर्किंगमुळे ते समाधानी नाही, असं 72 टक्के जणांनी स्वीकारलं.