संशयित रुग्णाच्या आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात

कोरोना संशयित रुग्णाची कोविड चाचणी आता त्याच्या आवाजाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. मुंबईतील नेस्को कोविड केंद्रात व्हॉईस बायोमार्कर्स हे यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांना वापर करण्यात येत आहे. कोरोना संशयित रुग्णाची कोविड चाचणी आता त्याच्या आवाजाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. मुंबईतील नेस्को कोविड केंद्रात व्हॉईस बायोमार्कर्स हे यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामुळे यंत्रणेद्वरे व्यक्तीची किंवा कोरोना रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्याच्या आवाजावरुन कोरोना अहवाल काढला जाणार आहे.

गोरेगावमधील नेस्को कोविड केंद्रात ही यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचा ऑनलाईन प्रारंभ केला आहे.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कोरोनाविरोधातील लढा अधिक बळकट होणार आहे. तसेच शहरातील कोरोना संशयित रुग्णांचे त्वरित निदान होईल आणि त्यांना मदत मिळेल. असे अदित्य ठाकरे म्हणाले.