The cost of the flyover at Borivali increased; Contract of Rs 161 crore to Rs 651 crore

बोरीवली पश्चिम येथील आर.एम. भट्टड मार्ग व एस.व्ही.रोड या जंक्शनवर २५ सप्टेंबर २०१८ रोजी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समितीच्या मान्यतेने एम.ई.पी.एल- स्पेको या संयुक्त भागीदारीतील कंपनीला विविध करांसह १६१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या पुलाचे बांधकाम १५ नोव्हेंबर २०१८ रोजी हाती घेण्यात आले. हे काम पावसाळा वगळून, २४ महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र पुलाचे बांधकाम वाढवण्यात आले आहे.

    मुंबई : बोरीवली पश्चिम येथील आर.एम. भट्ट मार्ग व एस.व्ही.रोड या जंक्शन येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात आला आहे. या उड्डाण पुलाच्या खर्चात १६१ कोटीच्या मूळ कंत्राट कामांमध्ये विविध करासह अतिरिक्त वाढ होत हा खर्च ६५१ कोटींवर पोहोचला आहे.

    बोरीवली पश्चिम येथील आर.एम. भट्टड मार्ग व एस.व्ही.रोड या जंक्शनवर २५ सप्टेंबर २०१८ रोजी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समितीच्या मान्यतेने एम.ई.पी.एल- स्पेको या संयुक्त भागीदारीतील कंपनीला विविध करांसह १६१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या पुलाचे बांधकाम १५ नोव्हेंबर २०१८ रोजी हाती घेण्यात आले. हे काम पावसाळा वगळून, २४ महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र पुलाचे बांधकाम वाढवण्यात आले आहे.

    बोरीवली पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या जनरल करिअप्पा पूल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोाडणाऱ्या विकास नियोजित रस्त्यावर सुमारे १३५ बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून करिअप्पा उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील उतार ते पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पुढे वाढवण्यात आले आहे. पुलाच्या विस्तारीकरणामुळे बांधकाम खर्चात वाढ झाली आहे.

    पश्चिमेकडील लिंक रोडवरील पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोडणारी मुक्त मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय या पुलाचे काम सुरू झाल्यानंतर आयएस कोडमध्ये नवीन सुधारणा लागू झाल्यामुळे, या पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बेअरींगमध्ये सुधार करणे अत्यावश्यक होते. त्यामुळे या बांधकामांच्या खर्चामध्ये वाढ होऊन हा खर्च आता ६५१ कोटींवर गेला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.