The costs incurred on the Central Vista project, make public health in the Corona crisis; Demand of left mass movement activists

मुंबईत डाव्या विचारसरणीच्या संस्था, संघटनानी येत्या १५ जून रोजी सेंट्रल विस्टा या जनता विरोधी अर्थात भारत विरोधी प्रकल्पावर होणारा अवाढव्य खर्च, कोरोना संकटात जनतेच्या आरोग्यावर करण्यात यावा या मागणीकरीता जन आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

  मुंबई : मुंबईत डाव्या विचारसरणीच्या संस्था, संघटनानी येत्या १५ जून रोजी सेंट्रल विस्टा या जनता विरोधी अर्थात भारत विरोधी प्रकल्पावर होणारा अवाढव्य खर्च, कोरोना संकटात जनतेच्या आरोग्यावर करण्यात यावा या मागणीकरीता जन आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

  सेंट्रल विस्टा विरोधी भारत या नावाने जन आंदोलन

  या बाबत मुंबईतील शेकापच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस विविध पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सेंट्रल विस्टा विरोधी भारत या नावाने जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार एकमताने करण्यात घेण्यात आला. उपस्थित प्रतिनिधीं पैकी अनेकांनी “सेंट्रल विस्टा” आणि त्यावरचा भरमसाठ खर्च आपल्या देशासाठी अनावश्यक असल्याचे मत नोंदवले. सेंट्रल विस्टावर होणारा अवाढव्य खर्च, भारतीय जनतेच्या आरोग्य सुविधांवर खर्च करण्यात यावा म्हणून हि नवगठीत समिती चळवळ करेल असे या बैठकीत ठरविण्यात आले.

  सर्व राजकीय पक्षांचा आंदोलनात सहभाग

  १५ जून २०२१ रोजी दुपारी ३ वाजता आंदोलन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. सर्व राजकीय पक्ष्यांच्या प्रमुखास या आंदोलनात सहभागी करून घेण्याचे ठरले. पुढील कामकाज व नियोजन करण्यासाठी, आ. विदयाताई चव्हाण, आ. आबू आझमी, डॉ विवेक कोरडे, डॉ निलेश पावसकर, ऍड राजू कोरडे, शैलेंद्र कांबळे, विशाल हिवाळे आदींची निमंत्रित समिती बनविण्यात आली.

  हे सुद्धा वाचा