देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज : आमदार रोहित पवार

रोहित पवार आपल्या या ट्विटमध्ये म्हणतात, देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आणि रिझर्व बँकेकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील.

    मुंबई – कोरोनाच्या या संकटकाळात देशाला सध्या लसीकरणाची सर्वाधिक जास्त गरज असल्यामुळे आरबीआयकडून मिळालेली ९९ हजार कोटींचे अतिरिक्त रक्कम त्यासाठी वापरावे असा सल्ला ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

    रोहित पवार आपल्या या ट्विटमध्ये म्हणतात, देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आणि रिझर्व बँकेकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील.

    राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथं कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि #GST मध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण ठरवावं.असं केलं तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू!