दुसऱ्या लिस्टची कट ऑफही नव्वदीच्या घरात! नामंकित कॉलेजमध्ये आर्ट्सला ॲडमिशन मिळणेही कठीण

दुसरी गुणवत्ता यादी ९० टक्क्यांच्या घरातच असून, पहिल्या यादीच्या तुनलेत चार ते पाच टक्क्यांनी घट झाली आहे.यंदा गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने पहिली गुणवत्ता यादी ९० टक्क्यांच्या पुढेच होती. त्यातही नामांकित महाविद्यालयांमधील गुणवत्ता यादी ९५ टक्क्यांच्यावरच होती. त्याचप्रमाणे नामांकित महाविद्यालयांमधील गुणवत्ता यादी ९० टक्क्यांच्या घरातच राहिली असून काही महाविद्यालयांमधील गुणवत्ता यादी ही ८५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्येही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

    मुंबई: अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी ४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता जाहीर झाली. दुसऱ्या यादीत १ लाख ३९ हजार ७९४ जागांसाठी अर्ज केलेल्या १ लाख ३३ हजार ७२३ विद्यार्थ्यांपैकी ६० हजार ३७ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेतील सर्वाधिक ३७ हजार १८६ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या. त्याखालोखाल विज्ञान शाखेतील १७ हजार ३३३ आणि कला शाखेतील ५१२५ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाला.

    दुसरी गुणवत्ता यादी ९० टक्क्यांच्या घरातच असून, पहिल्या यादीच्या तुनलेत चार ते पाच टक्क्यांनी घट झाली आहे.यंदा गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने पहिली गुणवत्ता यादी ९० टक्क्यांच्या पुढेच होती. त्यातही नामांकित महाविद्यालयांमधील गुणवत्ता यादी ९५ टक्क्यांच्यावरच होती. त्याचप्रमाणे नामांकित महाविद्यालयांमधील गुणवत्ता यादी ९० टक्क्यांच्या घरातच राहिली असून काही महाविद्यालयांमधील गुणवत्ता यादी ही ८५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्येही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

    पहिल्या यादीमध्ये अ‍ॅलॉट झालेल्या १ लाख १७ हजार ८८३ जागांवर अवघ्या ५८ हजार ५०६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. त्यातही पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्याचे प्रमाण अधिक होते. पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या १० हजार ५१५ विद्यार्थ्यांनी तर दुसऱ्याा क्रमांकाच्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या ९९९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारल्याने दुसर्‍या यादीमध्ये नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची आशा निर्माण झाली होती. त्यानुसार दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये अर्ज केलेल्या १ लाख ३३ हजार ७२३ विद्यार्थ्यांपैकी ६० हजार ३७ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या.

    यामध्ये एसएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या ५५ हजार ६६४, सीबीएसई मंडळाचे १५७३, आयसीएसई २१३१ आणि अन्य मंडळातील ६६९ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ४८ हजार ८४१, एससी ४८८९, एसटी ३२८, एनटी १००८, ओबीसी ४१८०, विशेष मागास प्रवर्ग ४३३ तर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील १०९ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाली. दुसऱ्या यादीमध्ये १३ हजार २८२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे तर ११ हजार ७५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे ८३९८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या, ७१२७ विद्यार्थ्यांना चौथ्या क्रमांकाच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]