मोनोरेलचे कंत्राटी कामगार संपावर; पगार मिळत नसल्याने घेतला निर्णय

अनेकदा कामगारांना आठवड्याच्या  सुट्टयां दिवशीही कामावर हजर राहावे,  लागत असल्याचे मत कामगारांनी व्यक्त केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हक्काच्या सुट्टीदिवशीही कामावर न आल्यास पगारातून पैसे कमी होतात असे आंदोलकांनी म्हटले आहे.

मुंबई: मोनोरेलच्या टिकिट काउंटरवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कामगारांनी संप पुकारला आहे. संपामुळे स्टेशन मास्टरला तिकीट काऊंटरवर बसावे लगत आहे. अनेकदा कामगारांना आठवड्याच्या  सुट्टयां दिवशीही कामावर हजर राहावे,  लागत असल्याचे मत कामगारांनी व्यक्त केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हक्काच्या सुट्टीदिवशीही कामावर न आल्यास पगारातून पैसे कमी होतात असे आंदोलकांनी म्हटले आहे. मैनेजमेंट ने संपावर गेलेल्या कामगारांना धमकी दिली आहे ,’ जर कामावर नाही आलात तर सर्वाना कामावरून काढून टाकले जाईल आणि नविन कामगारांना भरले जाईल,अशी धमकी मॅनेजमेंट ने संपावर गेलेल्या कामगारांना दिली आहे.