The danger increased even more; Corona becomes 'Delta Plus'

कोरोना व्हायरसचे डबल म्युटेशन सर्वप्रथम महाराष्ट्रात आढळून आले होते. तज्ज्ञांच्या मते, डेल्टा प्लस व्हेरियंट रुग्णांच्या रोग प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो. भारतात सर्वात अगोदर आढळून आलेल्या 'डेल्टा व्हेरियंट'मध्ये बदल होऊन 'डेल्टा प्लस व्हेरियंट' तयार झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    मुंबई : देशात कोरोना संक्रमणाच्या दुसरी लाट ओसरताना दिसत असतानाच कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’नं धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. कोरोेना विषाणूच्या या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागू शकते.

    देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चे 40 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रातून समोर आली आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अद्याप डेल्टा प्लस ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ अर्थात ‘उत्परिवर्तन अवस्थेत’ आहे.

    कोरोना व्हायरसचे डबल म्युटेशन सर्वप्रथम महाराष्ट्रात आढळून आले होते. तज्ज्ञांच्या मते, डेल्टा प्लस व्हेरियंट रुग्णांच्या रोग प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो. भारतात सर्वात अगोदर आढळून आलेल्या ‘डेल्टा व्हेरियंट’मध्ये बदल होऊन ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ तयार झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    देशातील छोटे आणि विशेषत: ईशान्येतील राज्यांमध्ये कोरोना नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 6 राज्यांमध्ये विशेष टीम रवाना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आणि उपाययोजनांसाठी या टीम पाठवण्यात आल्या आहेत. अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर, ओडिशा, केरळ आणि छत्तीसगडचा यात समावेश आहे. विशेष टीम राज्यांमध्ये कोरोना व्यवस्थापन, देखरेख, कंटेन्मेंटची प्रक्रिया आणि टेस्टिंग सारख्या बाबी बघेल. केंद्रीय टीम या राज्यांमधील कोविड स्थितीचे मूल्यांकन करतील आणि आवश्यक उपयायोजना सूचवतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्राच्या विशेष टीम या राज्यांमधील परिस्थितीचे आकलन करतील आणि संबंधित राज्य सरकारांना आरोग्यासंबंधी उपचारात्मक कारवाईसाठी सूचना करतील.