ramdas athavale

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या  निधनाने केवळ काँग्रेसचे  नाही तर  संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत एकनाथ गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    मुंबई :  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या  निधनाने केवळ काँग्रेसचे  नाही तर  संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत एकनाथ गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    दिवंगत एकनाथ गायकवाड हे बौद्ध आंबेडकरी जनतेचे लाडके नेते होते. त्यांचा आंबेडकरी चळवळीशी जवळचा संबंध होता.काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाच्या युतीच्या काळात एकनाथ गायकवाड यांचे माझ्याशी अत्यंत जवळचे संबंध होते. काँग्रेस रिपाइं युतीतुन १९९८ मध्ये दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून मला निवडून आणण्यात एकनाथ गायकवाड यांनी मोठी मदत केली होती. त्यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे दुःखद  वृत्त कळताच मला धक्का बसला. ते अत्यंत सुस्वभावी नेते होते. त्यांनी शेवटपर्यंत काँग्रेस पक्षात इमाने इतबारे  राहून काम केले. काँग्रेसचे ते निष्ठवंत नेते राहिले.

    मी पंढरपूर मधून खासदार म्हणून निवडून आलो त्याचवेळी दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी खासदार म्हणून खूप चांगले काम केले. धरावी विधानसभा मतदारसंघावर त्यांची चांगली राजकीय पकड होती. त्यांनी महाराष्ट्रात मंत्री म्हणुन ही चांगले काम केले. ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने काँग्रेस मधील आंबेडकरी चेहरा हरपला असून आंबेडकरी जनतेने रिपब्लिकन चळवळीने आपला मार्गदर्शक मददगार मित्र गमावला आहे अशी शोकभावना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.