डॉक्टरच बनले डॉक्टरांचे “सोबती”

-केईएम मार्डचे टास्क फोर्स सोडवित आहेत कोव्हिड समस्या मुंबई: मागील काही दिवसांपासून कोव्हिड संसर्ग वाढू लागल्यावर सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टरच संक्रमित होऊ लागल्याच्या घटना समोर येऊ

-केईएम मार्डचे टास्क फोर्स सोडवित आहेत कोव्हिड समस्या

मुंबई: मागील काही दिवसांपासून कोव्हिड संसर्ग वाढू लागल्यावर सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टरच संक्रमित होऊ लागल्याच्या घटना समोर येऊ लागल्या.त्यातून त्यांना क्वारंटाईन केले जात होते. मात्र त्यांची काळजी घेण्यासाठी कोणी ही नसल्याने अखेर डॉक्टरच डॉक्टरच्या मदतीला धावून आले आहेत.

डॉक्टर ‘पॉझिटीव्ह’ झाल्यापासून रुग्णसेवेत रुजू होईस्तोवर पॉझिटीव्ह डॉक्टरची काळजी ‘त्यांचे इतर "मित्र" डॉक्टर घेत आहेत.कर्मचाऱ्यामधे कोरोना संबंधित जागरुकता निर्माण करण्यासाठी टास्कफोर्स स्थापन करण्याचा अभिनव प्रयोग केईएम मार्डकडून करण्यात आला असून याचे कौतुक वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनायाकडूनही करण्यात आले. 

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत  केईएम मार्डने टास्क फोर्स युनिटची स्थापना केली. त्यातील सदस्यांच्या माध्यमातून अनेक डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या समस्या मागील काही महिन्यापासुन सोडविन्यात येत आहेत.अशा प्रकारचा उपक्रम सार्वजनिक रुग्णालयात राबविण्याबाबत  वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, केईएम मार्ड कोविड 19 टास्क फोर्समध्ये ५० हुन अधिक डॉक्टरची टीम एकत्रित रित्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. यात क्वारंटाईन आणि ट्रान्सपोर्ट,आयसोलेशन आणि मेडिकल केअर, पीपीई किट, अन्न, हॉस्टेल, अशा विविध ठिकाणी कमिटी स्थापन करण्यात आली असून त्या हे प्रश्न आपापल्या परीने सोडवत आहेत. तसेच यातून नर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम घेण्यात आले. निवासी डॉक्टरांना विविध एनजीओ सोबत संपर्क साधून त्यांना किट, सॅनिटायझर , अन्नाची पाकिटे यासारख्या गोष्टींचा वस्तीगृहापर्यंत पुरवठा केला. रोग प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी सर्व निवासी व इंटर्नस डॉक्टरांना सकस आहार उपलब्ध करून देण्यात आला.कोरोना पॉझिटिव्ह आल्यापासून सर्व काळजी घेतली जात आहे. त्यामुळे ते लवकर रुजू झाले आहेत. या टास्क फोर्सचे संचालन केइएम चे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाने तर समन्वय मार्डचे डॉ. कौस्तव दासगुप्ता याच्याकडून होत आहे.

"अधिष्ठाता, अनुभवी प्राध्यापक , टीम लीडर्स व ५० हून अधिक निवासी डॉक्टर गेले दीड महिना टास्क फोर्समध्ये राबत आहेत. या उपक्रमाचे श्रेय या सर्वांना जाते.असे उपक्रम इतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राबविण्याची गरज आहे’, ज्यामुळे रुगण्यालयीन कर्मचाऱ्यामधे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल."

-डॉ. दीपक मुंडे,‌ अध्यक्ष, केईएम मार्ड