मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १९५८ दिवसांवर; सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजारांच्या खाली

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना फेब्रुवारीच्या मध्यावर पुन्हा वाढल्याने पालिकेची चिंता वाढली होती. मात्र पालिकेच्या प्रभावी उपाययोजना आणि राज्य सरकारकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रुग्णसंख्या पूर्ण नियंत्रणात आली आहे. दरम्यान, कोरोनाची संभाव्य तिसर्‍या लाटेचा इशारा आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी देण्यात आला आहे.

    मुंबई : मुंबईत कोरोना आटोक्यात आला असून रोज आढळणा-या रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. सक्रीय रुग्णांची संख्याही घटली असून तीन हजारांखाली आली आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही झपाट्याने वाढून १९५८ दिवसांवर पोहचला आहे.

    मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना फेब्रुवारीच्या मध्यावर पुन्हा वाढल्याने पालिकेची चिंता वाढली होती. मात्र पालिकेच्या प्रभावी उपाययोजना आणि राज्य सरकारकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रुग्णसंख्या पूर्ण नियंत्रणात आली आहे. दरम्यान, कोरोनाची संभाव्य तिसर्‍या लाटेचा इशारा आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी देण्यात आला आहे.

    या पार्श्वभूमीवर राज्य व पालिका सज्ज झाली आहे. चाचण्यांची संख्या वाढवली असून सध्या ४० हजारांपर्यंत चाचण्या होत आहेत. यात तीनशेच्या आत पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्याही घटली आहे. मंगळवारपर्यंत सक्रीय रुग्णा्ंची संख्या २७९१ वर आली आहे. रुग्ण कमी झाल्याने रुग्ण दुपटीचा कालावधीही दिवसेंदिवस वाढतो आहे. घटणा-या रुग्णांमुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]