महापालिका निवडणुकी संदर्भात आज निवडणूक आयोग भूमिका स्पष्ट करणार

पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत अद्याप कोणतेही निर्देश आयोगाकडून मिळालेले नाहीत . याबाबत मार्गदर्शन करावे, निवडणूक घेतली जाणार आहे का? घेतल्यास कधी घेणार? बाबींची स्पष्टता करण्याची विनंती पालिकेने आयोगाला केली होती.

    मुंबई:  मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नऊ महिन्यांवर आली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना वाढू लागला आहे. त्यामुळे एप्रिल- २०२० मध्ये होणारी नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. ती अद्याप झाली नाही. मुंबई महानगर पालिकेचीही निवडणूक ही पुढे ढकलण्यात येईल का? असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. पण या प्रश्नाचे उत्तर उध्या सोमवारी होणाऱ्या पालिका व निवडणूक आयोगाच्या बैठकीतून मिळणार आहे.

    निवडणूक जवळ आली असल्यामुळे पालिकेच्या निवडणूक विभागाला तयारीला लागायला हवे होते. पण निवडणूक आयोगाचे कोणतेच निर्देश न आल्यामुळे पालिका निवडणूक विभागाने  निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. यात पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत अद्याप कोणतेही निर्देश आयोगाकडून मिळालेले नाहीत . याबाबत मार्गदर्शन करावे, निवडणूक घेतली जाणार आहे का? घेतल्यास कधी घेणार? बाबींची स्पष्टता करण्याची विनंती पालिकेने आयोगाला केली होती. त्याला अनुसरूनच सोमवारी व्हिडियो कॉन्फरन्सिंगने ही बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणूक आयुक्त युपी.एस मदान , पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे सहभागी होणार असल्याची माहिती पालिका निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.