हाथी मेरे साथी! गाळात रूतलेला ट्रक्टर काढण्यासाठी हत्तीने केली कमाल आणि…

मनुष्याच्या सर्वात जवळचा मित्र असलेला प्राणी म्हणजे हत्ती (Elephant). संकटात सापडलेल्या एका ट्रॅक्टर चालकाची (Tractor driver) हत्तीने कशा प्रकारे मदत केली, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबई : मनुष्यप्राणी हा शब्द आपण जर वेगळा केला तर मनुष्य (Human) आणि प्राणी (Animal) असे दोन नवीन शब्द तयार होतात. मनुष्य आणि प्राणी यांचं नातं एकच पण भावना या वेगवेगळ्या असू शकतात. उदा. मोगली… परंतु मनुष्याच्या सर्वात जवळचा मित्र असलेला प्राणी म्हणजे हत्ती (Elephant). संकटात सापडलेल्या एका ट्रॅक्टर चालकाची (Tractor driver) हत्तीने कशा प्रकारे मदत केली, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत नक्की काय आहे ?

या व्हिडिओत एक ट्रॅक्टर चिखलाच्या दलदलीत फसला होता. त्यामुळे ड्रायव्हरने ट्रॅक्टरला बाहेर काढण्याचे जोरदार प्रयत्न केले, मात्र ते प्रयत्न अपयशी ठरले. ड्रायव्हरचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्याने अखेर ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी हत्तीची मदत घेण्यात आली. चिखलाच्या दलदलीत फसलेला ट्रॅक्टर बाहेर काढणं ड्रायव्हरला जमत नव्हतं. त्यामुळे हत्तीला देखील ते लवकर जमणार नाही. असाच सर्वांचा अंदाज होता.

परंतु पुढे काय झालं…

चिखलात अडकलेला ट्रॅक्टर हत्तीनं अगदी सहज बाहेर काढला. हत्तीचं ते कौशल्य पाहून ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरसह सर्वजण आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर ट्रक्टर चालकाने सुटकेचा निश्वास सोडला असू्न हाथी मेरे साथी ही जाणीव त्या मनुष्याला प्रत्यक्षात झाली असावी. परंतु  नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यावर भरपूर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.