शिक्षण मंंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

महाराष्ट्रातील पाचवी ते आठवीच्या शाळा आज पासून सुरू झाल्या आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी शाळेत जाऊन उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत केले. चला मुलांनो चला! शाळेत चला, करु पुस्तकांशी बट्टी, असे गोड आवाहन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

मुंबई (Mumbai).  महाराष्ट्रातील पाचवी ते आठवीच्या शाळा आज पासून सुरू झाल्या आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी शाळेत जाऊन उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत केले. चला मुलांनो चला! शाळेत चला, करु पुस्तकांशी बट्टी, असे गोड आवाहन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आजपासून राज्यात ५ ते ८ वी चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यांतील म्हाळुंगी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडी या  जिल्हा परिषद शाळेस  शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी भेट देऊन मुलांच्या व शिक्षकांच्या शाळा सुरु झाल्याबद्द्ल प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ई-लर्निंग व डिजीटल शिक्षण कशाप्रकारे विद्यार्थिनी घेत आहेत याचे प्रात्यक्षिक मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांकडून समजावून घेतले व त्यांचे कौतुकही केले.

आज सकाळी पुणे महानगरपालिका हद्दीतील आपटे  व मॅार्डन शाळा  खाजगी व हुतात्मा शिरीष कुमार या मनपा च्या शाळेतील नववी व दहावी इयत्तेच्या शाळेला भेट दिली. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी कोरोनाच्या काळातील आँनलाईन शिक्षण व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या समोर असलेले आव्हान व शिक्षणविषयक चर्चा या भेटीच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सहजपणे शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे केली. शाळेत येताना व जातानाही तसेच सार्वजनिक ठिकाणी असताना मास्कचा वापर करणे. शारीरिक अंतर ठेवणे व सातत्त्याने हात स्वच्छ धुणे या आरोग्य विषयक सुचनांचे पालन करण्याच्या सूचना शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.

मुंबई महानगर पालिका, ठाणे महानगरपालिका व नवी मुंबई महापालिका हद्दीतील शाळा वगळता उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र पाचवी ते आठवीचे वर्ग सुरळीत सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या या स्वागत भेटीत शिक्षण मंत्र्यांसोबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष कुमार, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक व शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.