मुंबईत विनामास्क व्यक्तीविरोधात पहिला गुन्हा दाखल, पालिकेची धडक कारवाई सुरू

राज्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या ( Unmasked ) व्यक्तीविरोधात गोवंडी पोलीस (Govandi Police Station)  ठाण्यात काल बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पालिकेने (BMC) धडक कारवाई (first case filed ) सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेच्या एम/पश्चिम वॉर्डमधील चेंबूर परिसरात पालिकेच्या पाच जणांच्या पथकातर्फे विनामास्क असलेल्यांवर कारवाई सुरू होती. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या राहुल वानखेडे या तरुणाने मास्क घातला नव्हता. परंतु त्याच्या मित्राने मास्क घातला होता. मास्क न घातल्याबाबत पालिका पथकाने त्याला थांबवून मास्क का घातला नाही, याचा जाब विचारला.

त्यानंतर ‘मी कोरोना चाचणी केली आहे. मला कोरोना नाही. तसेच कोणतीही लक्षणे नाहीत त्यामुळे मास्क लावला नाही,’ असे उत्तर दिले. यावर पालिका कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आवश्यक असल्याचे सांगून दंड भरण्यास सांगितले. राहुलने दंड भरण्यास नकार दिला आणि पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. या प्रकारानंतर दंड न भरल्यामुळे त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे मास्क न घातल्यामुळे दाखल करण्यात आलेला मुंबईतील हा पहिलाच गुन्हा ठरला आहे.