A second dose of covishield to volunteers next week in Nair hospital

सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या कोव्हिशिल्ड या लसींच्या डोसचा साठा पहाटे ५.३० वाजता मुंबईत पोहोचला. बृहन्मुंबई पालिकेच्या विशेष वाहनानं ही लस आणण्यात आली. हे वाहन बीएमसीतर्फे पुण्याला पाठवण्यात आलं होतं. या वाहनातून मुंबईतील अत्यावश्यक वापरासाठी आवश्यक असणारा साठा दाखल झाला.

कोरोना लसींच्या डोसचं पुण्यातून वितरण झाल्यानंतर आता हे डोस देशातल्या वेगवेगळ्या राज्यात पोहोचायला सुरुवात झालीय. बुधवारच्या पहाटे मुंबईत हे डोस पोहोचले.

सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या कोव्हिशिल्ड या लसींच्या डोसचा साठा पहाटे ५.३० वाजता मुंबईत पोहोचला. बृहन्मुंबई पालिकेच्या विशेष वाहनानं ही लस आणण्यात आली. हे वाहन बीएमसीतर्फे पुण्याला पाठवण्यात आलं होतं. या वाहनातून मुंबईतील अत्यावश्यक वापरासाठी आवश्यक असणारा साठा दाखल झाला.

बृहन्मुंबई महापालिकेच्या परळमधील एफ दक्षिण विभागात हा साठा ठेवण्यात आला आहे. इथून मुंबईतील विविध ठिकाणी हा साठा रवाना केला जाणार आहे.

येत्या शनिवारी म्हणजेच १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोमवारपासून लसींच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. केंद्र सरकारनं सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांच्या लसींच्या आपत्कालीन वापरायला परवानगी दिली आहे. सीरमच्या लसीचे उत्पादन पुण्यातून होतं. त्यामुळे तिथूनच देशभरात या लसींचा पुरवठा केल्या जाणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना यापूर्वीच देण्यात आले होते. लसींच्या वितरण प्रक्रियेत कुठलेही अडथळे येऊ नयेत, यासाठी अधिकारीवर्ग सज्ज आहे. पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम देखील यासाठी रद्द केले आहेत.

महाराष्ट्रात १६ जानेवारीला लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता महाराष्ट्रात कोव्हॅक्सिनचा डोस मिळणार की कोव्हिशिल्डचा याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल. केंद्राकडून जे आदेश देतील त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. आपल्याला आपत्कालीन वापरासाठी १६ लाख लसींची आवश्यकता असल्याचं महाराष्ट्राकडून सांगण्यात आलंय. तर रोज दहा हजार कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन असल्याचे देखील टोपे यांनी सांगितले..

भारतात सुरुवातीला चार ते पाच कोटी लसींचं वितरण करण्यात येणार आहे. पहिले सहा महिने कदाचित लसींचा तुटवडा भासू शकतो, मात्र केंद्र सरकारने आवश्यक लसींचा आकडा आणि त्याबाबतची मागणी स्पष्ट केल्यानंतर तेवढे उत्पादन करणे शक्य होईल, असं सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.