११ मार्चला आढळला होता मुंबईत पहिला रूग्ण; वर्षभरानंतर आता अशी आहे मुंबईची स्थिती

मुंबईत कोरोना विषाणूचा पहिला रूग्ण ११ मार्च रोजी आढळला होता. त्यानंतर मुंबईत झपाट्याने रूग्णसंख्या वाढू लागली. सुमारे दीड ते दोन लाख लोकसंख्या असणाऱ्या मुंबई शहरात गेल्यावर्षी आजच्याच दिवशी धडक दिली होती. त्यानंतर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आिण बाधितांचीही संख्या वाढली. या एका वर्षात पाहता पाहता ३ लाख जण बाधित झाले असून ११ हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर बुधवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तब्बल १५३९ नवे रूग्ण आढळले आहेत.

  मुंबई : मुंबईत कोरोना विषाणूचा पहिला रूग्ण ११ मार्च रोजी आढळला होता. त्यानंतर मुंबईत झपाट्याने रूग्णसंख्या वाढू लागली. सुमारे दीड ते दोन लाख लोकसंख्या असणाऱ्या मुंबई शहरात गेल्यावर्षी आजच्याच दिवशी धडक दिली होती. त्यानंतर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आिण बाधितांचीही संख्या वाढली. या एका वर्षात पाहता पाहता ३ लाख जण बाधित झाले असून ११ हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर बुधवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तब्बल १५३९ नवे रूग्ण आढळले आहेत.

  कोरोनाचे रूग्ण आढळू लागल्यामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक झाले. आता लसीकरणाचेही काम सुरू आहे. मुंबईत ३ लाखांहून अधिकांनी लसीचा डोस घेतला आहे. कोरोनासोबत मुंबईकरांची लढाई अजूनही सुरू आहे.

  गेल्या पंधरा दिवसांत चार ते पाच दिवस मुंबईत एक हजारच्या वर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दोन दिवस साडे आठशे तर गेले चार दिवस अकराशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी १३६० सोमवारी १००८, मंगळवारी १०१२ रुग्ण आढळून आले. त्यात बुधवारी वाढ होऊन १५३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

  १५३९ रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख ३७ हजार १२३ वर पोहचला आहे. आज ५ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११ हजार ५११ वर पोहचला आहे. ८८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या ३ लाख १३ हजार ३४६ वर पोहचली आहे. मुंबईत सध्या ११ हजार ३७९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी २१५ दिवस इतका आहे.

  मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या २५ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर २२९ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३४ लाख ७५ हजार ७४४ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

  मुंबईत कोरोना वेगाने पसरत होता. नॉर्मल खाटा, ऑक्सिजन सपोर्ट खाटा, आयसीयू आण्िा व्हेंटिलेटरची कमतरता भासत होती. पालिका रूग्णालयांसह सुमारे ८६ खासगी रूग्णालये कोविड रूग्णालयांत रूपातंरित केली. एवढेच नाही तर वरळी, मुलुंड, बीकेसी, गोरेगाव, दहिसरमध्ये जम्बो काेविड सेंटर सुरू केले. मुंबईकरांना खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी १९१६ टोल फ्री क्रमांक सुरू केला. प्रत्येक वॉर्डमध्ये ‘वॉर्ड वॉर रूम’ स्थापित केला. सध्या मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगीतले.

  महिन्याभरात १,११८ रूग्ण

  मुंबईत ११ मार्च २०२० रोजी पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर केवळ एका महिन्यात अर्थात ११ एप्रिल २०२० पर्यंत रूग्णांची संख्या ११८२ वर पोहचली होती. एक वेळ अशीही आली की मुंबईत पॉझिटिव्ह रेट १५ टक्क्यांपर्यंत पोहचला होता. ७ ऑक्टोबरला सर्वात जास्त २८४८ रूग्ण एकाच दिवसात आढळले होते.

  रूग्णांसाठी ४६ हजार खाटा

  पालिकेने महामारीशी लढण्यासाठी कस्तुरबा रूग्णालयात सुरूवातीला १५ आयसोलेशन खाटांची तयारी केली होती. परंतु, रूग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे रूग्णांना खाटा मिळवण्यासाठी रूग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होता. पण पालिकेने या परिस्थितीवर वेळेतच नियंत्रण मिळवत कोविड सेंटर, रूग्णालयांत अतिरिक्त खाटांची व्यवस्था केली. आजमतिस पालिका रूग्णालयांमध्ये सुमारे ४६ हजार खाटा कोविड रूग्णांसाठी उपलब्ध आहेत.

  ६०० हून अधिक पॉझिटिव्ह महिलांची डिलिव्हरी

  कोरोनाच्या कचाट्यात गर्भवती महिलाही आल्या. त्यामुळे बाळासह आईचे प्राण वाचवणे पालिकेसमोर एक आव्हानच उभे राहिले होते. पॉझिटिव्ह महिलांची डिलिव्हरी करताना काय प्रोटोकॉल असेल, उपचार कसा करावा, याची माहिती नसल्यामुळे ही जबाबदारी नायर रूग्णालयाने घेतली. नायर रूग्णालयातील प्रसूति विभाग पॉझिटिव्ह गर्भव्ती महिलांसाठी समर्पित करण्यात आला. रूग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या अनुभव आणि कौशल्याचे प्रदर्शन घडवत ६०० हून अधिक पॉझिटिव्ह महिलांची यशस्वी प्रसुती करवून दाखवली.

  टेस्टिंग लॅब वाढवल्या

  कोरोना टेस्टिंगसाठी सुरूवातीला पालिकेच्या कस्तुरबा रूग्णालयावर निर्भर राहावे लागत होते. नंतर केईएम, सायन, नायरसह इतर रूग्णालयांतही आयसीएमआरची परवानगी मिळाल्यानंतर टेस्टिंग सुरू होऊ लागले. त्यामुळे रूग्णांना वेळेवर अहवाल मिळू लागला. टेस्टिंगची क्षमताही वाढवली. एका दिवसात पालिकेच्या रूग्णालयांत १२ ते १५ हजार आरटीपीसीआर टेस्ट होऊ लागल्या. तर दररोज ७ ते ८ लाख्ा रॅपिड अॅन्टिजन टेस्ट होत होत्या.