पहिली प्लाझ्मापेढी केईएम रुग्णालयात ;महत्वाकांक्षी प्रस्तावामुळे कोरोना उपचाराला कलाटणी

मुंबई : मुंबईतील पालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच प्लाझ्मा बँक सुरू केली जाणार आहे. प्लाझ्मा बँक सुरु करणारे पालिकेचे केईएम हे पहिले रुग्णालय ठरणार असून नायर आणि सायन अशा पालिकेच्या प्रमुख रुग्णालयातही प्लाझ्मा बँक सुरू केली जाणार असल्याचेही प्रस्तावित आहे.

मुंबई : मुंबईतील पालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच प्लाझ्मा बँक सुरू केली जाणार आहे. प्लाझ्मा बँक सुरु करणारे पालिकेचे केईएम हे पहिले रुग्णालय ठरणार असून नायर आणि सायन अशा पालिकेच्या प्रमुख रुग्णालयातही प्लाझ्मा बँक सुरू केली जाणार असल्याचेही प्रस्तावित आहे.
दरम्यान येत्या दोन आठवड्यात केईएम रुग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू केली जाणार असल्याचे सांगत केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी होकार दर्शवला आहे.या प्लाझ्मा पेढीतून प्लाझ्माची गरज सहज पूर्ण करण्यास मदत होणार आहे. दरम्यान दिल्ली शहारानंतर मुंबई शहरातील ही पहिली प्लाझ्मा बँक सुरू केली जाणार आहे.

सामाजिक संस्थेकडून जनजागृती करून प्लाझ्मा दाते शोधले जाणार आहेत. प्लाझ्मा दाते निकषावर योग्य ठरविण्यात येतील. प्लाझ्मा गोळा करून काही काळासाठी संकलित करुन ठेवला जाईल. कारण, कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव अजून किती काळ टिकेल याबाबत निश्चिती नसल्याकारणाने कोरोनामुक्त लोकांनी दान केलेला प्लाझ्मा किमान एक वर्ष साठवून ठेवता येईल यासाठी ही बँक महत्त्वाची भूमिका बजावेल.

केईएममध्ये ट्रान्सफ्युझन मेडिसीन हा विभाग असल्याकारणाने तिथे ही बँक सुरू करणे सोयीस्कर ठरणार आहे. सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना प्लाझ्माची गरज लागेल त्यांना प्लाझ्मा दिला जाईल. औषधांच्या किंमतीच्या तुलनेत प्लाझ्माची साठवणूक करणे हे कमी खर्चिक आहे. अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली आहे.

मुंबईतील रुग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर एक ते दोन आठवड्यात निर्णय होणार आहे. शुक्रवारी प्लाझ्मा बँक संदर्भातील झालेल्या बैठकीत याबाबतचा प्रस्तावही सादर झाला. इच्छुक प्लाझ्मा दाते बँकमध्ये प्लाझ्मा दान करू शकतील.

-डॉ. रमेश भारमल, वैद्यकीय संचालक, महापालिका रुग्णालये