सायन स्मशान भूमीतील गॅस दाहिनी अखेर  पाच महिन्यांनी सुरू

मुंबई :  मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. वरळी, भायखळा, धारावी हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. धारावीच्या हॉटस्पॉटपासून जवळच सायन स्मशान भूमी आहे. याठिकाणी गॅसवर चालणारी दाहिनी पाच महिने बंद होती. मात्र आता ही दाहिनी सुरू झाल्याने कोरोनाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होउ शकतात.

 गेल्या काही दिवसांत धारावीत कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तर आतापर्यंत धारावीत कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत कोरोनामुळे मृत्यू झालेले  दोन मृतदेह सायनच्या स्मशानभूमीत आणण्यात आले होते. मात्र गॅस दाहिनी बंद असल्याने हे मृतदेह दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क आणि दादर पूर्व येथील भोईवाडा स्मशानभूमीत पाठवण्यात आले होते. 
सायन स्मशान भूमीत विद्युत दाहिनी आहे. मात्र नोव्हेंबरपासून ही गॅस व विद्युत दाहिनी बंद  होती. कंत्राटदार आणि अभियांत्रिकी सेवा विभागाच्या भांडणात ही दाहिनी गेले पाच महिने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता ही दाहिनी सुरू झाल्याने या विभागात कोरोनामुळे मृत्यू झाल्यास तो मृतदेह इतर ठिकाणी न पाठवता त्या मृतदेहावर येथेच अंत्यसंस्कार करणे शक्य झाल्याचे सायन स्मशानभूमीतील  अधिकाऱ्यांने सांगितले. 
दरम्यान,  मुंबईत मुंबई महापालिकेच्या १० गॅस व विद्युत दाहिन्या सुरु आहेत. 
 
  – बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार –
सायन स्मशानभूमीमधील गॅस दाहिनी गेले पाच महिने बंद होती. दोन दिवसांपूर्वी ही दाहिनी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या दाहिनीवर दोन दिवसात ५ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले.
 
कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहावर गॅस व विद्युत दाहिन्यावरच अंत्यसंस्कार करण्यात येतात. यामुळे कोरोनाग्रस्त मृतदेहापासून अन्य कोणाला लागण होऊ नये, हा मुख्य उद्देश आहे. 
 
डाॅ. रमेश भारमल , संचालक, मुंबई महापालिका रुग्णालय