लाथ घातल्याशिवाय सरकारला जागच येत नाही;  विनायक मेटेेंचे टिकास्त्र

राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना १० टक्केआर्थिक मागास आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मेटे म्हणाले की, शिवसंग्रामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने दणका दिला तेव्हा राज्य सरकारने EWS आरक्षणाचा आदेश काढला. सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

    बीड : शिवसंग्रामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने दणका दिला होता. तेव्हा राज्य सरकारने EWS आरक्षणाचा आदेश काढला, असा दावा विनायक मेटे यांनी केला आहे.

    राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना १० टक्केआर्थिक मागास आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मेटे म्हणाले की, शिवसंग्रामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने दणका दिला तेव्हा राज्य सरकारने EWS आरक्षणाचा आदेश काढला. सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

    आता उशिरा का होईना पण राज्य सरकारने आदेश काढला, त्यांचे आभार. मात्र, याबरोबरच मराठा समाजाच्या इतर प्रश्ना संदर्भातही राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत. अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला तयार व्हा, इशा इशाराच मेटे यांनी ठाकरे सरकारला दिला.