सरकारचा दर निर्बंधाचा निर्णय आयएमएला मान्य

मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) सदस्यांकडून चालवणारी हॉस्पिटल्स कमी आकाराची व कमी खाटांची असून कोव्हिड काळात निर्जंतुकीकरणासाठी खर्च होत आहेत. तरीही राज्य सरकारकाकडून ८० टक्के खाटा

मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) सदस्यांकडून चालवणारी  हॉस्पिटल्स कमी आकाराची व कमी खाटांची असून कोव्हिड काळात निर्जंतुकीकरणासाठी खर्च होत आहेत. तरीही राज्य सरकारकाकडून ८० टक्के खाटा अधिग्रहण टक्केवारी व उपचारांचे दर इंडियन मेडिकल असोसिएशनला मान्य असून त्याचे स्वागत करण्यात आले आहे 

खासगी हॉस्पिटल वारेमाप फी आकारून रुग्णावर उपचार करत असल्याची टिका सतत केली जाते. मात्र ही कार्पोरेट हॉस्पिटल किंवा साखळी समूहातील हॉस्पिटल असल्याचे सांगण्यात आली. या हॉस्पीटल्सच्या तुलनेत आएमए सदस्यांची हॉस्पीटल्स कमी खाटांची असतात. ही हॉस्पीटले ५ ते‌ ७० खाटांची छोटी ते मध्यम आकारांची रुग्णालये आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात इतर व्यवसाय प्रमाणे वैद्यकीय व्यवसाय देखील मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. लॉकडाऊन आणि कंटेनमेंट झोनमधील रुग्ण त्यांच्या येण्या जाण्याच्या असुविधेमुळे हॉस्पिटल्समध्ये येऊ शकत नाहीत. या कारणाबरोबरच सरकारने डॉक्टरांना सध्या फक्त अत्यावश्यक रुग्ण तपासावेत आणि साध्या आजारांचे उपचार आणि शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या असे आदेश यापूर्वीच दिले आहेत. छोट्या हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचारी आजाराच्या धास्तीने आणि प्रवासाच्या असुविधेमुळे गैरहजर राहत आहेत. शिवाय  कोव्हिड काळात सुरक्षा साधने (पीपीइ किट्स) आणि इस्पितळाचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे लागत असल्याने हॉस्पीटलांचा खर्चही वारेमाप वाढत असल्याची समस्या मांडण्यात आली आहे.‌

करोना विषाणूच्या या जागतिक आपत्तीत देखील आयएमए सदस्यांची हॉस्पीटल्स रास्त दरात रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहेत. हा आयएमएकडून सरकारला सकारात्मक प्रतिसाद असल्याचे आएमएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातून सरकारने दिलेला ८० टक्के जागांचे व उपचारांचा खर्चाचा आदेश ३१ जुलै पर्यंतच मान्य करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

“सरकारने या काळात त्याग करण्यास आवाहन केले आहे. या आवाहनाचा आम्ही आदर करत आहोत. सध्यापेशंट कमी, खर्च वाढले आहेत. तरीही चार्जेस कमी घेत ८० टक्के खाटांचे अधिग्रहण मान्य आहे.”  

– डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए