पंढरपूर पायी वारीबाबत सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा होता; फेरविचार करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे अवाहन

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्टिट करत आषाढी वारी बाबत मत व्यक्त केले आहे की, कमी उपस्थितीत पायी वारी करणे शक्य होते. सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पारंपारीक आषाढी वारी पायी होवू शकली नाही. त्यामुळे यंदाही ही परंपरा खंडीत होवू नये यासाठी मानाच्या दहा पालख्या त्या त्या गावांहून वाहनाने पंढरपूरला नेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मात्र पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून वाखरी ते पंढरपूर पोलीस बंदोबस्तात पायी वारी होणार आहे.

  मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्टिट करत आषाढी वारी बाबत मत व्यक्त केले आहे की, कमी उपस्थितीत पायी वारी करणे शक्य होते. सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पारंपारीक आषाढी वारी पायी होवू शकली नाही. त्यामुळे यंदाही ही परंपरा खंडीत होवू नये यासाठी मानाच्या दहा पालख्या त्या त्या गावांहून वाहनाने पंढरपूरला नेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मात्र पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून वाखरी ते पंढरपूर पोलीस बंदोबस्तात पायी वारी होणार आहे.

  कुणीही रस्त्यावर येणार नाही

  याबाबत माध्यमांसमोर बोलताना फडणवीस म्हणाले की, कमी उपस्थितीची पायी वारी करता येणे हे शक्य होते. थोडा सरकारने जर विचार केला असता. तर निश्चितपणे, कारण त्यांची जी मागणी होती की, केवळ ५० लोकांची परवानगी दिली जावी. यासोबत त्यांनी मार्गावरील सगळ्या गावांचे ठराव घेतले आहेत, की गावातून कुणीही रस्त्यावर येणार नाही. त्यामुळे इतके शिस्तीत जर काम होते. तर त्यांचा गंभीरतेने विचार सरकारने करायला हवा होता.” असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

  निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन

  दुसरीकडे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी शासन सांगेल त्या संख्येत संपूर्ण पायी व्हावी अशी अद्यापही वारकऱ्यांची अपेक्षा आहे. आळंदी संस्थानाने सरकारला निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले आहे. तर, यंदाही राज्य सरकारने वाहनांनी त्या त्या गावातून दहा पालख्या पंढरपूरला नेण्याच्या निर्णयावर वारकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यापूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांना बसने जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीत बोलताना दिली होती.

  हे सुद्धा वाचा