rohit pawar

राज्यातील काही भागांत शिथिलता आणली असता, अनेक उद्योगांना परवानगी (Permision) देण्यात आली आहे. राज्यातील हॉटेल (Hotel) चालकांना घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु हॉटेल सुरू करण्याची परवानगी अजूनही देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे जीम आणि क्लासेसवरही निर्बंध कायम आहेत. यावर लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जीम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी केले आहे.

कोरोना विषाणूच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे. तसेच देशात अनलॉकची प्रक्रिया (unlock) सुरू आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत शिथिलता आणली असता, अनेक उद्योगांना परवानगी (Permision) देण्यात आली आहे. राज्यातील हॉटेल (Hotel) चालकांना घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु हॉटेल सुरू करण्याची परवानगी अजूनही देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे जीम आणि क्लासेसवरही निर्बंध कायम आहेत. यावर लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जीम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी केले आहे.

कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात. पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता हॉटेल, जिम, क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा,ही विनंती व घेतला जाईल असा विश्वास आहे, असं रोहित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.

जिम-व्यायामशाळांवरील निर्बंध दूर करा :

जुलै महिन्यात राज्यभर विविध महानगरांत टाळेबंदी कठोर झाली. ऑगस्टमध्ये जनजीवन थोडे सुरळीत होऊ लागलं होतं. पण त्याचबरोबर करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढते आहे. ऑगस्ट महिन्यात टाळेबंदी शिथिल करताना मॉल्स, व्यापारी संकुल, खासगी दुकाने, सरकारी, खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आता बाजारपेठा खुल्या झाल्या, व्यवसाय सुरू झाले. परंतु जिम, हॉटेल, धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.