तुम्ही पाहाच ! तीन महिन्यात सरकार पडणार; मुनगंटीवार यांचा खळबळजनक दावा

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणे आणि टिकवणे ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती,’ असेही मुनगंटीवार म्हणाले.

  Maha(Mumbai).  राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणे आणि टिकवणे ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती,’ असेही मुनगंटीवार म्हणाले. जेव्हा सूडाचे राजकारण वाढते, तेव्हा सत्तेचा प्रलय येतो. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचाच नंबर आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

  शुभकार्य कधी ना कधी व्हायचंच आहे. जनहित विरोधी सरकार, अधिवेशन घ्यायचे नाही. मागच्या वर्षभरात 116 तास 39 मिनिटे अधिवेशन झाले. यावेळी 47 तास अधिवेशन झाले. शेकडो प्रश्न कोरोना काळात तयार झाले. असाधारण परिस्थिती होते. अशापरिस्थितीही फक्त सुडाचे राजकारण सुरू आहे. -- सुधीर मुनगंटीवार

  महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चाच नाही
  यावेळी त्यांनी अधिवेशनात झालेल्या कामकाजावरही भाष्य केले. वीजबिलावर चर्चा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा नाही. भाडे थकीत आहे. गोरगरीबांसाठी काहीही पॅकेज नाही. आत्मनिर्भर, शक्तीमान, वैभवशाली महाराष्ट्र उभा करण्यासाठी अनेक उद्योगांना प्रोत्साहन देण्याची भूमिका नाही. असे सरकार टिकवणे तेही राजकीय दृष्टीने सर्वात मोठी घोडचूक होईल, असा दावाही त्यांनी केला.

  खलनायकही ताकदीचा लागतो
  राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा 2024 पर्यंत नक्की चालेल. भाजपाने पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षाची भूमिका आतासारखीच उत्तमपणे पार पाडत राहावी. कोणत्याही सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो. त्यांच्यामुळेही सिनेमा जोरात चालतो. महाविकासआघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रं उत्तमपणे वठवत आहेत. सरकारचं 2024 नंतर बघू. तोपर्यंत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका भक्कमपणे पार पाडावी. सरकार एवढ्या दिवसांत किंवा महिन्यात पडेल, ही धमकी देणं बंद करावं. — संजय राऊत, खासदार, शिवसेना