
महाविकासआघाडी सरकारकने या शिफारस यादीबाबत दोन वेळा राज्यपालांकडे विचारणा केली. मात्र, राज्यपालांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या यादीवर नेमका कधी शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या यादीतील एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांच्यासह आठ जणांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करण्याला आक्षेप घेत याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : विधानपरिषदेच्या बहुचर्चित १२ आमदारांच्या नावांची यादी महाविकासआघाडी(mahavikas aghadi) सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Governor Bhagatsingh Koshyari) यांच्याकडे सुपूर्द करुन महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मात्र, राज्यपालांकडून काहीच प्रतिसाद येत नसल्याने ठाकरे सरकारची धाकधुक वाढली आहे.
महाविकासआघाडी सरकारकने या शिफारस यादीबाबत दोन वेळा राज्यपालांकडे विचारणा केली. मात्र, राज्यपालांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या यादीवर नेमका कधी शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या यादीतील एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांच्यासह आठ जणांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करण्याला आक्षेप घेत याचिका दाखल करण्यात आली आहे.
६ नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी देण्यात आली होती. राज्यपालांकडे नावं देतानाच ठाकरे सरकारकडून १५ दिवसांच्या मुदतीची शिफारस मागण्यात आली होती.
मात्र, अद्यापही राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. महाविकास आघाडी सरकारने मुदतीची शिफारस करून राज्यपालांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप राज्यपालांनी यादीतील नावे जाहीर केलेली नाहीत.
महाविकासआघाडी सरकारने पाठवलेल्या १२ आमदारांची नावे
राष्ट्रवादी
एकनाख खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे
काँग्रेस
रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुध्द वनकर
शिवसेना
उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर, नितीन बानगुडे पाटील