डोंबिवलीत चक्क वाहत होता हिरवा नाला ; कारण जाणून तुम्ही व्हाल हैराण

डोंबिवली एमआयडी मधून नाल्यात केमिकल सोडण्यात आले. त्यामुळे गांधीनगर परिसरातून वाहणारा नाला पूर्ण हिरवगार झाला आहे. त्यातुन वास सुद्धा येत होता. तब्बल १ तास हा प्रकार पाहायला मिळाला.

    मुंबई: सातत्याने कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली असताना दुसरीकडे रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत आज चक्क हिरवा नाला पाहायला मिळाला. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस त्यानंतर ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. तर फेब्रुवारी २०२० रोजी गुलाबी रस्ता पहायला मिळाला.

    डोंबिवलीत गेल्या २ दिवसांपासून चांगलंच पाऊस पडत आहेत. याचा फायदा घेत आज सकाळी डोंबिवली एमआयडी मधून नाल्यात केमिकल सोडण्यात आले. त्यामुळे गांधीनगर परिसरातून वाहणारा नाला पूर्ण हिरवगार झाला आहे. त्यातुन वास सुद्धा येत होता. तब्बल १ तास हा प्रकार पाहायला मिळाला.त्यामुळे नागरिक हैराण झाले. एमआयडीसी, एमपीसीबी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आशा घटना घडत आहेत असे सामाजिक कार्यकर्तेचे म्हणणे आहे.

    मनसे आमदार राजू पाटील यांनी याबाबत ट्विट केले आहे. डोंबिवलीकरांची या जीवघेण्या प्रदुषणापासून सुटका कधी होणार ? गांधीनगरचा हा नाला बंधिस्त करावा किंवा पाईपलाईन द्वारे केमिकलयुक्त पाणी सोडण्यात यावे यासाठी आयुक्तांकडे सतत पाठपुरावा करूनही काहीच होताना दिसत नाहीत. पर्यावरण मंत्री आदित्य ठकरे यांनी जरा लक्ष द्या, असे आमदाराणी ट्विट केले. त्यामुळे एमआयडी मधील कामा संघटना याकडे लक्ष देणार का पहावे लागेल.