शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य

शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाहीच असंही त्यांच म्हणण आहे. दानवे यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई : दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाहीच असंही त्यांच म्हणण आहे. दानवे यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. यांनी पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? असा सवाल उपस्थित करत दानवे यांनी आपले वक्तव्य पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगतीतले जात आहे. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असा सल्लाही दानवेंनी दिलाय.