२६/११ चा हिरो ‘या’ कारणामुळे मुंबई सोडण्याच्या तयारीत

अजमल कसाब आणि इस्माईल खान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील प्रवाशांवर गोळीबार करत होते. स्टेशनवरील प्रवाशांना लक्ष्य करुन गोळीबार करत होते. त्यावेळी छोटू चायवाल्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम करत होता. परंतु लॉकडाऊनमुळे त्याच्यासमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.

मुंबई : कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे व्यवसायाचा अभाव आणि वाढत्या कर्जामुळे निराश होऊन २६/११ चा हिरो मुंबई सोडण्याच्या तयारीत आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊन असल्यामुळ सर्वसामान्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनचा फटका अनेक उद्योगांना आणि व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे हताश होऊन काहींनी आपला व्यवसाय बंद केले आहेत.

२६/११ चा हिरो छोटू चायवाला मुंबईतून आपला गाशा गुंडाळण्याचा तयारीत आहे. मुंबईत २६/११ चा हल्ला झाला तेव्हा छोटू चायवाल्याने जखमी झालेल्या नागरिकांना हात गाडीवरुन सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले होते. अजमल कसाब आणि इस्माईल खान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील प्रवाशांवर गोळीबार करत होते. स्टेशनवरील प्रवाशांना लक्ष्य करुन गोळीबार करत होते. त्यावेळी छोटू चायवाल्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम करत होता. परंतु लॉकडाऊनमुळे त्याच्यासमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.

सीएसएमटीच्या दक्षिणेकडे बाहेर जाण्यासाठीच्या रस्त्यावर छोटूचे दोन चहाचे स्टॉल आता पाच महिन्यांपासून बंद असल्याने छोटू आता चहा विकून काही पैसे कमवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु तो जी काही कमाई करत आहे. त्यातून त्याला नफा होत नाही आहे. मिळालेल्या पैशामध्ये घर आणि त्याच्या तीन कामगारांचे खर्च भागत नाही आहे.
१९९५ मध्ये छोटू १२ वर्षाचे असताना मुंबईत आले. तेव्हा ते मदतनीस म्हणून एका फूड स्टॉलमध्ये रुजू झाले. तेव्हा काम करत असताना त्यांना छोटू हे नाव पडले. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये छोटूने कर्मचाऱ्यांना पगाराची भरपाई करत असताना उसने पैसे घेतले होते. तसेच घरखर्चासही पुरेसे पैसा उपलब्ध नाही आहेत. असे छोटू चायवाला म्हणाला.

२६/११ च्या वीरांनी त्यांना २७ पुरस्कार आणि ७०,००० रुपये रोख रक्कम मिळवून दिले. त्यांनी या रक्कमेचा वापर करुन आपला पहिला स्टॉल सुरु केला. जो विना परवाना आहे. यावर्षि फेब्रुवारी महिन्यात त्यांच्याकडे व्यवसाय वाढवण्यासाठी पुरेसे पैशांचा साठा झाला होता. त्यात त्यांनी दुसरा स्टॉल सुरु केला. या स्टॉलवर बीएमसी परवाना होता. त्यांना नेहमी बीएमसीच्या पडणाऱ्या छाप्यापासून सुटका हवी होती. परंतु त्यांनी स्टॉल घेतल्यानंतर कोरोना विषाणु आला आणि सर्वच ठप्प झाले. यामुळे त्यांच्यावर कर्ज झाले आहे. त्यामुळे ते म्हणाले माझ्याकडे डुमेरी येथे परत जाणे हा एकमेव पर्याय उरला आहे. बिहारमधील मुझप्फर जिल्हात नव्याने आयुष्याला सुरुवात करणार असल्याचे त्याने सांगितले.