प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मागील दहा महिन्यात काेविडमुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यूची नाेंद ही पुरुषांची करण्यात आली असल्याची माहिती राज्य अाराेग्य विभागाने दिली आहे. मृत्यूमध्ये पुरुषांचे प्रमाण ६९.८ टक्के म्हणजेच ३४,४९९ एवढे मृत्यू झाले असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्या तुलनेने महिलांच्या मृत्यूची नाेंद ही कमी असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे.

मुंबई : मागील दहा महिन्यात काेविडमुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यूची नाेंद ही पुरुषांची करण्यात आली असल्याची माहिती राज्य आराेग्य विभागाने दिली आहे. मृत्यूमध्ये पुरुषांचे प्रमाण ६९.८ टक्के म्हणजेच ३४,४९९ एवढे मृत्यू झाले असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्या तुलनेने महिलांच्या मृत्यूची नाेंद ही कमी असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे.

३०.२ टक्के महिलांच्या मृत्यूची नाेंद करण्यात आली असल्याची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदिप अावटे यांनी दिली. तसेच मागील दाेन महिन्यात काेविड मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असल्याचेही समाेर अाले अाहे. डिसेंबर महिन्यात मृत्यू दर २ टक्क्यांवर पाेहचला असल्याची माहिती डाॅ. आवटे यांनी दिली.

फेब्रुवारी २०२० पासून राज्यात कराेनाचे रुग्ण आढळू लागले. मार्चच्या अखेरीपर्यंत रुग्णांच्या संख्येत घट हाेती. परंतु, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली, मागील दहा महिन्यात राज्यात १९७१५५२ बाधित रुग्णांची संख्या आहे. तर, १८६७९८८ रुग्ण बरे झाल्याची नाेंद करण्यात आली आहे. तसेच ५०१०१ रुग्णांचा अातापर्यंत मृत्यू झाला आहे, यात ११७५ जणांचा मृत्यू इतर कारणामुळे झाला असल्याचे समाेर आले आहे.

राज्यात आतापर्यंत ५०१०१ मृत्यूची नाेंद करण्यात आली असून यापैकी ६०-६९ या वयाेगटातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे नाेंद करण्यात आली आहे. यात उच्चरक्तदाब सर्वाधिक सामान्य इतर व्याधी याचे प्रमाण ४६.७ टक्के एवढे आहे. तर प्रमुख आजारापैकी मधुमेह आजाराने झालेल्या मृत्यूचे प्रमाण ३९.४ टक्के एवढे आहे. प्रत्येक पाचव्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब व मधुमेह ही दाेन प्रमुख कारणे आढळून आली आहेत. तर ११ टक्के रुग्णांना हदयाचे विकार असल्याची नाेंद करण्यात आली आहे. भारताच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कराेना मृत्यूच्या संख्येत भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.