थकीत बिलांमुळे अखेर रुग्णालयातील औषध पुरवठा मध्यरात्रीपासून बंद; बिले दिल्याशिवाय तोडगा काढणार नसल्याचे औषध पुरवठादारांची माहिती

मागील दहा महिन्यांपासूनची हाफकीन कडे साधारणत: १०३ कोटी रूपयांची थकबाकी आहे, ‘‘बिलाची पूर्ण रक्कम दिल्याशिवाय कोणताही तोडगा काढणार नाही, थकीत बिलाची रक्कम द्या’’ असा इशारा देत अखेर साेमवार मध्यरात्रीपासून औषध पुरवठादारांनी औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनकडून सांगण्यात आले.

मुंबई (Mumbai).  मागील दहा महिन्यांपासूनची हाफकीन कडे साधारणत: १०३ कोटी रूपयांची थकबाकी आहे, ‘‘बिलाची पूर्ण रक्कम दिल्याशिवाय कोणताही तोडगा काढणार नाही, थकीत बिलाची रक्कम द्या’’ असा इशारा देत अखेर साेमवार मध्यरात्रीपासून औषध पुरवठादारांनी औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनकडून सांगण्यात आले.

यााबाबत पत्र लिहुन बिलांचे पैसे चुकते करण्याची मागणी मागील काही महिन्यांपासून ऑल फुड अँड ड्रग लायसन्स हाेल्डर फाउंडेशन सातत्याने करत आहे. या संदर्भात पुरवठादारांनी अनेकदा निवेदने व आंदोलने केली. पुरावठादारांच्या मागणीला हाफकीन प्रशासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांिगतले. गेल्या १० महिन्यांतील थकीत बिलांमुळे पुरवठादारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असल्याचे पुरावठादार सांगतात . प्रशासन चर्चेलाही टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पुरवठादार करत आहे.

वैद्यकीय शिक्षण व संधोधन संचालनालय अतर्गत २१ वैद्यकीय महाविद्यालय आहेत. तर सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न ३४ छोटी-मोठी रूग्णालये आहेत. या रूग्णालयांना लागणारी औषधे हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विकत घ्यावी लागतात, असा राज्य सरकारने २०१८ मध्ये अध्यादेश काढून हा निर्णय घेतला होता. औषध पुरवठा बंद झाल्याने वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालयांत औषधांचा तुटवडा होऊ शकतो. हाफकीन चर्चेसाठी वेळ देत नाही. तसेच थकीत बिले चुकती करण्यास टाळाटाळ करत असल्याने नाईलाजाने आम्हाला औषध पुरावठा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.
अभय पांडे , राष्ट्रीय अध्यक्ष , ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशन