हॉटेल्स,बिअरबार होणार सुरु…वाचा पाचव्या अनलॉक मध्ये काय सुरु, काय बंद

मुंबई : राज्य सरकार मिशन बिगिन अगेनअंतर्गत पाचव्या अनलॉकसाठी सज्ज झाले असून याबाबतच्या गाईडलाईन्स सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. या अनलॉकमध्ये सरकारने अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्य सरकार (Maharashtra Government)मिशन बिगिन अगेन (Mission Begin Again)अंतर्गत पाचव्या अनलॉकसाठी (Maharashtra Unlock 5 Guidelines)सज्ज झाले असून याबाबतच्या गाईडलाईन्स सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. या अनलॉकमध्ये सरकारने अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्यात लोकल सुरु होणार आहेत. तसेच मुंबईतील डबेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अनलॉक येत्या ५ ऑक्टोबरपासून अंमलात येणार असून यात ५०% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. अनलॉक प्रक्रिया ही आर्थिक ताण कमी करण्यासाठी आणि राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी करण्यात येत आहे मात्र कोरोनाचा (CoronaVirus)धोका अद्याप टळला नसल्याने अनलॉक प्रकियेत सोशल डिस्टंन्सिग, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.

 

हे सुरु होणार
राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी
डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी
मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढणार
पुणे विभागातील लोकल व ट्रेन सुरू होणार

काय बंद राहणार?
शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस,सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क,प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास,
राज्यातील मेट्रो सेवा बंद राहील. या अनलॉक मध्ये सरकारने मेट्रो, रेल्वे, जिम व मंदिरे यांच्याबाबत अद्याप काही निर्णय घेतला नाही.