डिस्काऊंटची आयडीया कामी आली; म्हाडाने केली रेकॉर्ड ब्रेक कमाई

३५५ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सुमारे ८ हजार ५२० मुळ सभासदांचे पुनर्वसन होऊन ४५ चौ.मी. चटई क्षेत्रफळाचे अंदाजे १४ हजार विक्री गाळे म्हाडाच्या विविध वसाहतींमध्ये उपलब्ध होणार आहेत. दि. १४ जानेवारी २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार या १४ हजार विक्री गाळ्यांचे मुद्रांक शुल्क हे खरेदीदारांकडून न भरता, विकासकामार्फत भरणा करावयाचे आहे. या १४ हजार विक्री गाळ्यांची अंदाजित किंमत प्रत्येकी रु.७५ लाख ग्राह्य धरून त्यावरील ५% मुद्रांक शुल्क प्रमाणे रू.५२५ कोटी (१४,०००५% रू.७५.०० लाख) राज्य शासनास प्राप्त होणार आहेत. त्यामुळे सदनिकांचे खरेदी विक्रींचे व्यवहार होऊन बांधकाम उद्योगाला चालना मिळत आहे.

    मुंबई : राज्य शासनाच्या ऑगस्ट २०१९ रोजीच्या अधिसूचनेन्वये अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील (EWS, LIG & MIG) संस्थांकरिता अधिमुल्य आकारणीमध्ये अनुक्रमे ५०% व २५% ची घट व विकास उपकर (७%) मध्ये पुर्णतः सुट दि. १९.०८.२०२१ पर्यंत लागू केली होती. तसेच दि. १४ जानेवारी २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत प्रत्यक्ष जमा करण्यात येणाच्या अधिमुल्य रकमेवर ५०% एवढी सूट लागू केलेली आहे.

    या दोन्ही शासन निर्णयामुळे संस्थांना मंडळाकडे भरणा करावयाच्या अधिमुल्यामध्ये निव्वळ ७५% इतकी सुट व विकास उपकरात पूर्ण सुट मिळत आहे. त्या अनुषंगाने या संस्थांकडून मुंबई मंडळाकडे विक्रमी महसूल जमा असून गृहनिर्माण विभागाने गेल्या दीड वर्षात घेतलेल्या निर्णयांचे हे फलित आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

    शासनाच्या ३ जुलै २०१७ रोजीच्या अधिसूचनेन्वये गृहसाठा हिस्सेदारी तत्वाऐवजी अधिमुल्य आधारित तत्वानुसार म्हाडा वसाहतीतील इमारतींचा पुनर्विकास करणेकरिता सहकारी गृहनिर्माण संस्थांना पर्याय दिलेला आहे. त्यानुसार जुलै २०१७ पासून ते २० ऑगस्ट २०१९ पर्यंत म्हणजेच साधारणत: २५ महिन्यांमध्ये १०६ नवीन प्रकल्पांना देकारपत्र देण्यात आले असून ५८५ कोटी रुपयांचा अधिमुल्य महसूल म्हाडा मुंबई मंडळाकडे जमा झालेला आहे. या तुलनेत २१ ऑगस्ट २०१९ ते १३ जानेवारी २०२१ या १७ महिन्यांमध्ये (५० टक्के अधिमुल्य ) ६७ नवीन प्रकल्पांना देकार पत्र जारी करण्यात आले असून ३३५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.तर, १४ जानेवारी २०२१ ते १९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ( २५% अधिमुल्य ) नवीन १८२ व जुने १७३ अशा एकूण ३५५ संस्थांना देकार पत्र जारी करण्यात आले असून १ हजार ११४ कोटी रुपये इतका विक्रमी महसूल जमा झाला आहे अशी माहिती मंत्री डॉ.आव्हाड यांनी दिली.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]