एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाबाबत परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती, ‘या’ तारखेला होणार पगार

एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Employees)  पगार (Payment) रखडल्यामुळे ते हवालदील झाले आहेत. परंतु एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार येत्या गुरूवारी (Thursday)  मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी ट्विटरवरून (Twitter) दिली आहे.

 मुंबई : संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूने (Corona virus) थैमान घातले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून (Last six months) राज्यात ठप्प असलेली लालपरी (ST Bus) आता वेगाने धावू लागली आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Employees)  पगार (Payment) रखडल्यामुळे ते हवालदील झाले आहेत. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार येत्या गुरूवारी (Thursday)  मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी ट्विटरवरून (Twitter) दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत मी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले.कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. असे अनिल परब यांनी सांगितले आहे.

ऑगस्ट महिन्यात एसटी कामगारांच्या थकीत पगाराचा मुद्दा समोर आला होता. तिजोरीत खडखडात झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने निधी मंजूर केला होता. तातडीने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा बँक खात्यात जमा करण्यात आला होता. मार्च आणि एप्रिल महिन्यातील थकीत पगार सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला होता.

एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन लवकरच देणार असून, त्यापैकी एक महिन्याचे वेतन येत्या गुरुवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली. पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उध्दव ठाकरे यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत मी महामंडळाची आर्थिक स्थिती विषद करताना पुढील सहा महिन्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी व इतर अनुषंगिक खर्चासाठी शासनाने महामंडळाला आर्थिक मदत करावी अशी विनंती केली होती.

त्यानुसार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.अजित पवार यांनी तातडीने १५० कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. त्यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, त्यातुन कर्मचाऱ्याचे किमान एक महिन्याचे थकित वेतन महामंडळाला देणे शक्य होईल. उर्वरित वेतनासंबंधी देखील उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजित पवार यांच्याशी माझी सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच ते वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येईल असे मंत्री,परब यांनी स्पष्ट केले आहे.