State government offers 50 per cent rebate on restaurant, bar license fees, decision welcomed by restaurant owners

मुंबई : इंडियन हॉटेल अॅण्‍ड रेस्‍टॉरण्‍ट असोसिएशन (आहार) या उद्योगक्षेत्राच्‍या सर्वोच्‍च संस्‍थेने राज्‍य सरकारच्‍या परवाना शुल्‍कावर ५० टक्‍के सूट आणि प्रस्‍तावित १५ टक्‍के वार्षिक वाढीच्‍या रोलबॅकसंदर्भातील निर्णयाचे स्‍वागत केले आहे.

या निर्णयामुळे लॉकडाऊन कारणास्‍तव ७ महिन्‍यांपासून बंद असलेल्‍या संकटग्रस्‍त उद्योगक्षेत्राला मदत होईल अशी प्रतिक्रिया आहारच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

”महामारीमुळे करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनचा तीव्र फटका बसलेल्‍या उद्योगाला पाठिंबा देण्‍यासाठी हे अत्‍यंत सकारात्‍मक पाऊल आहे. आम्ही आगामी दिवसांमध्‍ये अशी सहाय्यक पावले उचलण्‍याची अपेक्षा करतो. यामुळे उद्योगक्षेत्राला स्थिती सुरळीत करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करण्‍यामध्‍ये मदत होईल असे आहारचे अध्‍यक्ष शिवानंद शेट्टी म्‍हणाले.

आमचे उद्योगक्षेत्र दुसरे सर्वात मोठे रोजगार देणारे आहे. मुंबई व आसपासच्‍या परिसरामध्‍ये ६० लाख प्रत्‍यक्ष रोजगार असण्‍यासोबत २ कोटी अप्रत्‍यक्ष रोजगार आहेत. या निर्णयामुळे सरकारला देखील महसूल प्राप्‍त होण्‍यामध्‍ये मदत होईल असेही ते म्हणाले.