भारतीय संघाची घोषणा झाली, ‘या’ खेळाडूंचा संघात समावेश ; धोनी बजावणार मेंटॉरची भूमिका

कोरोनाच्या संकटामुळे भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक  आता युएई आणि ओमान देशांतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी होणार आहेत.

  मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बहुप्रतिक्षित टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच केली आहे. अंतिम १५ खेळाडूंची नावे जाहीर केली आहे. विराट कोहलीकडे (Virat Kohli) कर्णधार पदाची धुरा सोपवत काही नवख्या खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे. तसेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या संघाचा मेन्टॉर असणार आहे. बीसीसीआयच्या बैठकीत ही घोषणा झाली आहे. या बैठकीला बीसीसीआय अधिकाऱ्यांसह विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे जोडले गेले होते.

  टी- २० विश्वचषकासाठीचा भारतीय संघ

  भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

  राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर

  भारताचे विश्वचषकातील सामने

  भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-२मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला २४ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  भारत विरुद्ध पाकिस्तान (२४ ऑक्टोबर)
  भारत विरुद्ध न्यूझीलंड (३१ ऑक्टोबर)
  भारत विरुद्ध अफगाणिस्तान (३ नोव्हेंबर)
  भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ १ (५ नोव्हेंबर)
  भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ २(८ नोव्हेंबर)
  या ठिकाणी रंगणार विश्वचषकाचे सामने

  कोरोनाच्या संकटामुळे भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक  आता युएई आणि ओमान देशांतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी होणार आहेत. याबाबत काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता.