आरक्षणाचा मुद्दा आणखी तापणार; सत्ताधारी विरोधक आमने-सामने

  मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर साध्य महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय घमासान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला असून मूळ मुद्दा बाजूला राहतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

  राणे समितीने काय दिले लावले

  शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिले लावले हे सर्वांनाच माहीत आहे, असे सांगतानाच मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हातून दिला गेला याचेच आश्चर्य वाटते, असे राऊत म्हणाले.

  …तर आम्ही पवारांच्या मागे ठामपणे उभे राहू

  मी वारंवार सांगत आलोय फक्त बीड किंवा विनायक मेटे नाही तर जे-जे कोणी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावर येतील मग पवार साहेब जरी रस्त्यावर उतरले तरी भाजपाचा झेंडा न घेता त्यांच्या मागे उभा राहू. विनायक मेटे तर आमचे सहयोगी पक्ष आहेत.

  सरकारला ‘शॉक’ देणार

  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हाताने घालवलेले मराठा आरक्षण तसेच त्यांनी मराठा समाजाची केलेली धूळफेक या मुद्द्यावरून नांदेडचा ‘करंट’ घेऊन आगामी अधिवेशनात सरकारला चांगलाच ‘शॉक’ देणार असे आ. आशीष शेलार यांनी केले आहे.