दिवंगत प्रकाश भोसले आंबेडकरी विचारांचे सच्चे पाईक : राज्यमंत्री रामदास आठवले

आंबेडकरी चळवळीत नि:स्वार्थपणे काम करीत असताना प्रकाश भोसले यांनी कोणालाही दुखविले नाही. रात्री अपरात्री आंबेडकरी चळवळीच्या विचाराने, कृत्याने झपाटलेला माणूस म्हणून प्रकाश भोसले यांची ओळख होती. बाबासाहेबांच्या चळवळीतील सच्चा कार्यकर्ता आपल्यातून अचानकपणे निघून गेल्याने समाजाची फार मोठी हानी आहे. दिवंगत प्रकाश भोसले म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या सच्चा पाईक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

मुंबई (Mumbai).  आंबेडकरी चळवळीत नि:स्वार्थपणे काम करीत असताना प्रकाश भोसले यांनी कोणालाही दुखविले नाही. रात्री अपरात्री आंबेडकरी चळवळीच्या विचाराने, कृत्याने झपाटलेला माणूस म्हणून प्रकाश भोसले यांची ओळख होती. बाबासाहेबांच्या चळवळीतील सच्चा कार्यकर्ता आपल्यातून अचानकपणे निघून गेल्याने समाजाची फार मोठी हानी आहे. दिवंगत प्रकाश भोसले म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या सच्चा पाईक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

दिवंगत प्रकाश भोसले यांची श्रध्दांजली सभेचे आयोजन शगुन हॉल, माहुल रोड, चेंबूर याठिकाणी करण्यात आले होते. तेंव्हा आठवले बोलत होते. या श्रध्दांजली सभेचे सूत्रसंचालन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले तर दिवंगत प्रकाश भोसले यांचा जीवनावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री अविनाश महातेकर, मंत्री नवाब मलिक, पीआरपी चे आ.जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, अ‍ॅड निलेश भोसले आदि मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतर आंदोलनात प्रकाश भोसले यांनी बालवयापासून सहभाग घेतला. माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भारतीय दलित पँथर ते रिपब्लिकन पक्ष मला साथ दिली. नामांतर चळवळीत प्रकाश भोसले यांनी भरीव योगदान दिले. चेंबूर अनुशक्तीनगर भागात रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून अनेक वर्षे त्यांनी जनसेवा केली. नगरसेवक म्हणून त्यांनी लोकप्रिय होते, असे मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांचे व्यक्तिमत्व नम्र, निष्ठावान आणि अभ्यासू असल्याने ते कार्यासम्राट समाजसेवक होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली असल्याची भावना आठवले यांनी व्यक्त केली.