आत्महत्येसाठी रेल्वे ट्रॅकवर थांबलेल्या महिलेचे मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण ; घटना CCTV कैद

६० वर्षीय महिला मुंबईजवळच्या नालासोपारा भागातील राहणारी असून, तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर मुलगा तिला सोडून पुण्यात राहतो. त्यामुळे नैराश्यातून तिने आपलं जीवन संपवण्याचा विचार केला असल्याचे समोर आले आहे.

    वसई: वसई रोड रेल्वे स्थानकात एका ६० वर्षीय महिलेला मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले आहे. पतीनिधनाचे दुःख आणि परगावी राहणारा मुलगा या कारणांमुळे आलेल्या नैराश्यातून महिला आयुष्य संपवण्यासाठी महिला रेल्वे ट्रॅकवर उभी राहिली होती. मात्र मोटरमनने प्रसंगावधान राखत वेळीच गाडी थांबवल्याने पुढील अनर्थ टळला आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी धावत जाऊन महिलेला ट्रॅकवरुन बाजूला नेले.

    मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वसई रोड रेल्वे स्थानकात एका 60 वर्षीय महिलेला जीवदान मिळाले आहे. पतीनिधनाचे दुःख आणि परगावी राहणारा मुलगा या कारणांमुळे आलेल्या नैराश्यातून महिला आयुष्य संपवण्याच्या तयारीत होती. pic.twitter.com/JiWE9c65HL

    — Anish Bendre (@BendreAnish) September 12, 2021

    ही ६० वर्षीय महिला मुंबईजवळच्या नालासोपारा भागातील राहणारी असून, तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर मुलगा तिला सोडून पुण्यात राहतो. त्यामुळे नैराश्यातून तिने आपलं जीवन संपवण्याचा विचार केला असल्याचे समोर आले आहे.वसई रोड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    सई रोड रेल्वे स्थानकात ही महिला रेल्वे ट्रॅकवर आलेली, पण समोरुन आलेल्या लोकल ट्रेनची गती कमी असल्याने मोटरमनने गाडी थांबवून हॉर्न वाजवला. त्यामुळे समोरचे दृश्य पाहून प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेल्या जीआरपीचे पोलीस कर्मचारी एकनाथ नाईक हे धावत गेले आणि त्या महिलेला ट्रॅकच्या बाजूला काढून तिला जीवदान दिले आहे.