लहान मुले तापाने फणफणतायेत!; तिसऱ्या लाटेबाबत टास्क फोर्सचा तूर्तास तरी नकार

येत्या काही महिन्यात कोरानाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेमुळे लहान मुले संक्रमित होण्याबाबतची शंका आरोग्य विभागाने वर्तवली आहे. असे असताना, मागील काही दिवसांपासून लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला यासारख्या साथीच्या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत.

  • बदलत्या हवामानामुळे लहान मुलांच्या तब्येतीवर परिणाम

मुंबई: मागील काही दिवसांपासून मुंबईतील बदलत्या वातावरणाचा लहान मुलांवर चांगलाच परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या बदलत्या वातावरणाने लहान मुले सर्दी, ताप, खोकला या आजारांनी ग्रस्त आहेत. ज्यामुळे पालक चिंतेत असून कोरानाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत तर नाही ना? असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. परंतु, कोविड टास्क फोर्सने तिसऱ्या लाटेबाबत नकार दिला असून बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांना त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही, लहान मुलांची काळजी घ्यावी, कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

येत्या काही महिन्यात कोरानाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेमुळे लहान मुले संक्रमित होण्याबाबतची शंका आरोग्य विभागाने वर्तवली आहे. असे असताना, मागील काही दिवसांपासून लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला यासारख्या साथीच्या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. ज्यामुळे मुंबई शहर व उपनगरातील पिडीयाट्रिक दवाखान्यात व रुग्णालयात लहान मुले उपचार घेत असल्याचे दिसून येत आहेत. ज्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लहान मुलांच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष व सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला हे प्रमाण वाढले आहे. पण साथीचे आजार काेराेनाबराेबर जाेडणे चुकीचे आहे. वातावरणात हाेत असलेल्या बदलावामुळे लहान मुले साथीच्या आजाराने त्रस्त आहे. सायन रुग्णालयात दिवसभरात ओपीडीमध्ये २० ते २५ मुले साथीच्या आजाराने त्रस्त असल्याने उपचारासाठी येत असल्याचे रुग्णालयाच्या वरिष्ठ डाॅक्टरांकडून सांगण्यात आले.

उपनगरात झाेपडपट्टी परिसरात प्रॅक्टिस करत असलेले युनायटेड मेडिकल असाेिसएशनचे महासचिव डाॅ. जाहिद खान यांनी सांगितले की, आमच्या दवाखान्यात दिवसाला १० ते १५ मुले ताप, सर्दी, खाेकलाने त्रस्त असल्याने उपचारासाठी येतात. तसेच बऱ्याचदा लहान मुलांच्या यकृताला सूज असल्याचे दिसून येते. बहुतांशी लहान मुले जंक फूड खात असल्याने सूज येते. मागील काही दिवसांपासून ऊन व पाऊस असे बदलते वातावरण असल्याचे साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ हाेते. परिणामी, लहान मुलांमध्ये बदलत्या वातावरणाचा परिणाम दिसून येताे.

हिंदुजा रुग्णालयातील पिडीयाट्रिक विभागाचे वरिष्ठ डाॅक्टर नितीन शाह यांनी सांगितले की, ‘ओपीडीमध्ये दरराेज १० मुले उपचारासाठी येत असतात. यापैकी ८ मुले इन्फ्लूएंझाने ग्रासित असतात. इन्फ्लूएंझा मध्ये मुलांना ताप, सर्दी, खाेकला लक्षणे दिसून येतात तर आरएसवी मध्ये लहान मुलांच्या छातीत संक्रमण हाेते, श्वास घेण्यास त्रास हाेणे अशी लक्षणे आढळतात. बहुतांशी वेळा आरएसवी वायरसमध्ये २ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये दिसून येतं, सर्दी, ताप अथवा खाेकला अशी लक्षणे असल्यास काेराेना संक्रमित असेल अशी शंका पालकांनी मनात आणू नये. पण लहान मुलांची याेग्य काळजी घ्यावी व त्यांना त्वरीत उपचार करावे.

The little ones are feverish The task force immediately denied the third wave