लाॅकडाऊन अजून पुर्णपणे उठला नाही, कोरोना वाढल्यास जनता जबाबदार राहील : विजय वडेट्टीवार

आणखी लाॅकडाऊन पुर्णपणे उघडला नाही, फक्त काही नियम शिथिल करण्यात आले आहेत, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. राज्यात एकूण 43 युनिट तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 युनिटलाच अनलॉकिंगची परवानगी मिळाली आहे. अजून कोरोना संपलेला नाही. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढल्यास जनता जबाबदार राहील. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे. मास्क न घालता वावरल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

    मुंबई : कोरोना रूग्णसंख्या होत असल्यामुळे आता राज्यात आता हळूहळू अनलाॅक करण्यात येत आहे. त्यासाठी पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाॅझिटीव्हिटी दर आणि ऑक्सिजन खाटांची संख्या यावरून पाच स्तर तयार करण्यात आले आहेत.

    पण आणखी लाॅकडाऊन पुर्णपणे उघडला नाही, फक्त काही नियम शिथिल करण्यात आले आहेत, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. राज्यात एकूण 43 युनिट तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 युनिटलाच अनलॉकिंगची परवानगी मिळाली आहे. अजून कोरोना संपलेला नाही. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढल्यास जनता जबाबदार राहील. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे. मास्क न घालता वावरल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

    दरम्यान मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसुत्री विसरू नका आणि प्रशासनाचे सर्व निर्देश पाळून यंत्रणेला सहकार्य करा, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं आहे. त्यानंतर सर्वच स्तरातून कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. सामुहिक प्रयत्नांनीच आपण कोरोनाला पराभूत करू शकतो. अन्यथा तिसरी लाट कुणालाच परवडणार नाही. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे.

    महाराष्ट्रात अनलॉक होणार, अशी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे चांगलेच अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. महाराष्ट्रातील 18 जिल्हे उद्यापासून पूर्णपणे उघडणार असल्याचं वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितली होती. त्यानंतर हे सर्व प्रकरण चांगलंच पेटल्याचं चित्र पहायला मिळालं होतं.